IPO Open sakal
Share Market

IPO Open : श्री करणी फॅबकॉमचा आयपीओ आज खुला, ग्रे मार्केटमध्ये शेअर्सना 300 रुपयांचा भाव...

श्री करणी फॅबकॉमचा (Shree Karni Fabcom) आयपीओ आज खुला झाला आहे. यातून 42.49 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. श्री करणी फॅबकॉम लगेज, मेडिकल आर्क सपोर्ट, खुर्च्या, शूज आणि पोशाख यांसारख्या उद्योगांसाठी कस्टमाइज्ड निटेड आणि वुवन फॅब्रिक तयार करते.

सकाळ वृत्तसेवा

श्री करणी फॅबकॉमचा (Shree Karni Fabcom) आयपीओ आज खुला झाला आहे. यातून 42.49 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. श्री करणी फॅबकॉम लगेज, मेडिकल आर्क सपोर्ट, खुर्च्या, शूज आणि पोशाख यांसारख्या उद्योगांसाठी कस्टमाइज्ड निटेड आणि वुवन फॅब्रिक तयार करते. श्री करणी फॅबकॉम आयपीओमध्ये 6 ते 11 मार्चपर्यंत पैसे गुंतवले जाऊ शकतात. आयपीओमध्ये 18.72 लाख नवीन शेअर्स जारी केले जातील. आयपीओसाठीचा प्राइस बँड 220-227 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आला आहे. तर किमान लॉट आकार 600 शेअर्सचा आहे.

एनएसई एसएमईवर 14 मार्चला शेअर्सचे लिस्टिंग होऊ शकते. होरायझन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत आणि मास सर्व्हिसेस लिमिटेड या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत. आयपीओसाठी मार्केट मेकर एमएलबी स्टॉक ब्रोकिंग आहे. या आयपीओमध्ये, पात्र संस्थागत खरेदीदारांसाठी 50 टक्के, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे.

कंपनीचे प्रमोटर मनोज कुमार कर्नानी, राधे श्याम डागा, राजीव लखोटिया आणि राज कुमार अग्रवाल आहेत. प्रमोटर्सची सध्या कंपनीत 96.16 टक्के हिस्सेदारी आहे. आयपीओनंतर ही हिस्सेदारी 70.07 टक्के कमी होईल. ग्रे मार्केटमध्ये श्री करणी फॅबकॉमच्या शेअर्सची किंमत 300 रुपये म्हणजेच 132.16 टक्के प्रीमियमने अप्पर प्राइस बँडच्या तुलनेत ट्रेडिंग करत होता.

ग्रे मार्केट हा एक अनधिकृत बाजार आहे जिथे कंपनीचे शेअर शेअर बाजारात लिस्ट होण्यापूर्वी ट्रेड करतात. एप्रिल-नोव्हेंबर 2023 या काळात श्री करणी फॅबकॉमचे ऑपरेशन्सचे उत्पन्न 75.72 कोटी होते. आर्थिक वर्ष 2023 मध्ये महसूल 126.94 कोटी होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT