Share Market News sakal
Share Market

Share Market News : भरघोस नफा कमावण्याची संधी ! लवकरच येणार इकोस इंडिया मोबिलिटीचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा

इकोस इंडिया मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी लिमिटेड (Ecos India Mobility & Hospitality Ltd) लवकरच आपला आयपीओ आणायच्या तयारित आहे. कंपनीने शुक्रवारी बाजार नियामक सेबीकडे आपल्या आयपीओशी संबंधित कागदपत्रे सादर केली. त्यानुसार हा आयपीओ पूर्णपणे ऑफर-फॉर-सेल (OFS) असेल.

सकाळ वृत्तसेवा

इकोस इंडिया मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी लिमिटेड (Ecos India Mobility & Hospitality Ltd) लवकरच आपला आयपीओ आणायच्या तयारित आहे. कंपनीने शुक्रवारी बाजार नियामक सेबीकडे आपल्या आयपीओशी संबंधित कागदपत्रे सादर केली. त्यानुसार हा आयपीओ पूर्णपणे ऑफर-फॉर-सेल (OFS) असेल. म्हणजेच कंपनी या आयपीओमध्ये कोणतेही नवीन शेअर्स जारी करणार नाही, उलट तिचे प्रमोटर्स आणि शेअरहोल्डर्स त्यांचे शेअर्स विकतील. आयपीओमधून मिळालेली रक्कम कंपनीच्या खात्यात जाणार नाही, तर शेअर्स विकणाऱ्या प्मोटर्स आणि शेअरहोल्डर्सच्या खात्यात जाईल.

कंपनीचे प्रमोटर राजेश लूम्बा आणि आदित्य लूम्बा सुमारे 1.8 कोटी शेअर्सची ऑफर-फॉर-सेल (OFS) करतील. सध्या इको इंडिया मोबिलिटीमध्ये प्रमोटर्स आणि प्रमोटर ग्रुपच्या कंपन्यांकडे 100 टक्के हिस्सा आहे. इको इंडिया मोबिलिटी कॉर्पोरेट ग्राहकांना 25 वर्षांहून अधिक काळ भाड्यावर कार (CCR) आणि कर्मचारी वाहतूक सेवा (ETS) प्रदान करत आहे. त्यांच्या ताफ्यात परवडणाऱ्या ते लक्झरी कारपर्यंत 9,000 हून अधिक वाहने आहेत.

एका अहवालानुसार, जागतिक स्तरावर कॉर्पोरेट मोबिलिटी मार्केट 2023 ते 2030 या कालावधीत अंदाजे 9.6 टक्के वाढीचा अंदाज आहे. या कालावधीत भारतातील कॉर्पोरेट मोबिलिटी मार्केटचा वाढीचा दर 10.7 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे. इक्विरस कॅपिटल आणि आयआयएफएल सिक्युरिटीज हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी वाढ! चांदीही 3 लाखांवर; गुंतवणूकदार खुश, मात्र सर्वसामान्यांची चिंता वाढली; पाहा आजचा भाव

Kabanur Protest in Kolhapur : महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्यामुळे कबनूरमध्ये तणाव; संतप्त जमावाची इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडे धाव, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला धमकीचा मेल

Video : अरे, ही काय डोक्यावर पडलीय का? Hardik Pandya बाद होताच, गर्लफ्रेंड माहिका शर्माने काय केलं पाहा; नेटिझन्स संतापले

Stock Market Today: ट्रम्प टॅरिफला धक्का देत शेअर बाजार उसळला! सेन्सेक्स 400 अंकांनी वाढला; मात्र IDFC घसरला; कोणते शेअर्स तेजीत?

SCROLL FOR NEXT