Stock market holidays in November 2023 Will BSE, NSE remain closed on Diwali Balipratipada  Sakal
Share Market

Stock Market Holiday: दिवाळीत शेअर बाजार किती दिवस राहणार बंद? जाणून घ्या महत्वाचे अपडेट्स

Stock Market Holiday: गेल्या दिवाळीपासून आत्तापर्यंत बाजारात काय घडल?

राहुल शेळके

Stock Market Holiday: शेअर बाजारात दिवाळीसारखी चमक आल्याने गुंतवणूकदारही खूश आहेत, मात्र दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पुढचा आठवडा शेअर बाजारात ट्रेडिंगसाठी छोटा असणार आहे. साधारणपणे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी असते. मात्र, यावेळी सुट्टीत थोडा बदल झाला आहे. अशा स्थितीत दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शेअर बाजार कधी बंद असणार?

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच BSE वर उपलब्ध असलेल्या या वर्षीच्या कॅलेंडरनुसार मुहूर्ताचे व्यवहार रविवारी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी होतील.

त्यानंतर सोमवारी शेअर बाजारात व्यवहार होईल. दिवाळी बलिप्रतिपदेमुळे मंगळवारी सुट्टी असेल. म्हणजेच 14 नोव्हेंबरला शेअर बाजार बंद राहील. 15 नोव्हेंबरपासून गुंतवणूकदार किंवा व्यापारी बाजारात व्यवहार करू शकतील.

गेल्या दिवाळीपासून आत्तापर्यंत बाजाराची स्थिती

गेल्या दिवाळीपासून शेअर बाजारात बरेच काही घडले आहे. कच्चे तेल असो किंवा जागतिक अनिश्चितता असो या घटनांचा शेअर बाजारावर परिणाम झाला. मात्र, या चढ-उतारातही भारतीय बाजाराने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला.

निफ्टी 9.5 % पर्यंत वाढला. या काळात रियल्टी क्षेत्राने चांगली कामगिरी केली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप क्षेत्रातील शेअर्सनीही गुंतवणूकदारांना 40 टक्क्यांपर्यंत परतावा दिला.

गेल्या दिवाळीपासून आतापर्यंत निफ्टीमध्ये चांगली कामगिरी करणारे शेअर्स

  • टाटा मोटर्स : +60.5%

  • L&T : +57.6%

  • ONGC : +46.5%

  • बजाज ऑटो : +46%

  • NTPC : +41.8%

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT