tata motors share price market cap rs 3 lakh crore tata group 3rd company Sakal
Share Market

Tata Motors : ‘टाटा मोटर्स’चे बाजारमूल्य तीन लाख कोटींहून अधिक

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी ‘टाटा मोटर्स’ने तीन लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्याचा विक्रमी टप्पा पार केला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी ‘टाटा मोटर्स’ने तीन लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्याचा विक्रमी टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारी टाटा समूहाची ही तिसरी कंपनी ठरली आहे.

यापूर्वी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि टायटनने तीन लाख कोटी रुपयांचा बाजारमूल्याचा टप्पा गाठला होता. मंगळवारी (ता. १६) ‘टाटा मोटर्स’च्या शेअरमध्ये ८२७ रुपयांची पातळी गाठत ५२ आठवड्यांचा उच्चांक नोंदवला. त्यामुळे कंपनीचे बाजारमूल्य तीन लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले.

टाटा मोटर्सच्या एकूण बाजारमूल्यात टाटा मोटर्सचे २,७३,९८५ कोटी आणि डीव्हीआर शेअर्सचे २७,९४० कोटी यांचा समावेश आहे. ‘टाटा मोटर्स’ने या वर्षी आतापर्यंत चार टक्के परतावा दिला आहे. टाटा समूहाच्या सहा कंपन्यांमध्ये ‘टीसीएस’चे बाजार भांडवल सर्वाधिक आहे. ‘बीएसई’च्या माहितीनुसार, १६ जानेवारीपर्यंत कंपनीचे बाजारमूल्य १४ लाख कोटी रुपये आहे, तर टायटनचे बाजारमूल्य ३.४१ लाख कोटी रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT