YES Bank share price jumps over 6 percent  Sakal
Share Market

Yes Bank Share: येस बँकेचे शेअर्स 4 वर्षानंतर पुन्हा अ‍ॅक्शन मोडवर; काय आहे कारण?

Yes Bank Share: येस बँकेच्या (Yes Bank) शेअर्समध्ये सध्या चांगली अ‍ॅक्शन दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांत बँकेचा शेअर 3 टक्क्यांहून अधिक घसरला होता पण नुकताच तो 6 टक्क्यांहून अधिक वाढला आणि जवळपास चार वर्षांनी 26 रुपयांच्या पुढे गेला आहे.

राहुल शेळके

Yes Bank Share : येस बँकेच्या (Yes Bank) शेअर्समध्ये सध्या चांगली अ‍ॅक्शन दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांत बँकेचा शेअर 3 टक्क्यांहून अधिक घसरला होता पण नुकताच तो 6 टक्क्यांहून अधिक वाढला आणि जवळपास चार वर्षांनी 26 रुपयांच्या पुढे गेला आहे.

शेअर्समधील ही वाढ ब्रोकरेज एमकेने वर्तवलेल्या अंदाजामुळे झाली आहे. येस बँकेचे शेअर्स बीएसईवर 6.14 टक्क्यांनी वाढून 26.25 रुपयांवर पोहोचले, जे एका वर्षातील उच्चांक आहे. प्रॉफिट बुकींगमुळे किंमत थोडी नरमली पण ती अजूनही चांगल्या स्थितीत आहे. दिवसअखेर बँकेचा शेअर 3.80 टक्क्यांच्या वाढीसह 25.67 रुपयांवर बंद झाला.

ब्रोकरेजच्या अंदाजानुसार, येस बँकेचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 705.6 टक्के आणि तिमाही आधारावर 62.6 टक्क्यांनी वाढून 415.1 कोटीपर्यंत पोहोचू शकतो. त्याचे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) वार्षिक आधारावर 4.5 टक्के आणि तिमाही आधारावर 5.3 टक्क्यांनी वाढून 2,059 कोटीपर्यंत पोहोचू शकते.

त्याच वेळी प्री-प्रोव्हिजन ऑपरेटिंग प्रॉफिट (PPOP) वार्षिक आधारावर 6.6 टक्के आणि तिमाही आधारावर 2.7 टक्क्यांनी वाढून 853.4 कोटीपर्यंत पोहोचू शकते.

येस बँकेचे निकाल 27 जानेवारी 2024 रोजी येतील. बँकेने 4 जानेवारीला आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली होती. त्यानुसार, डिसेंबर तिमाही आणि एप्रिल-डिसेंबर 2023 साठी स्टँडअलोन आणि कंसालिडेटेड आर्थिक निकालांचा विचार केला जाईल आणि 27 जानेवारीला संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर केला जाईल.

येस बँकेचे शेअर्स गेल्या वर्षी 23 ऑक्टोबर 2023 रोजी 14.10 रुपयांवर होते, जी एका वर्षातील नीचांकी पातळी आहे. यानंतर, या शेअर्सने तीन महिन्यांत 86 टक्क्यांहून अधिक झेप घेतली आणि आज तो 26.25 रुपयांवर पोहोचला, जो एक वर्षाचा विक्रमी उच्चांक आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

Google Privacy Settings : तुमच्या प्रत्येक हालचालीवर गुगलची नजर? आत्ताच बंद करा 'या' 4 सेटिंग; नाहीतर ट्रॅक होत राहील डेटा

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

Gujarat-Assam Flood Crisis : गुजरात अन् आसामवर आभाळ फाटलं; मुसळधार पावसामुळे पूर, जनजीवन विस्कळीत.. 872 गावे पाण्याखाली

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान, २००हून अधिक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

SCROLL FOR NEXT