Share Market sakal
Share Market

Share Market : झोमॅटोच्या शेअर्समध्ये येईल 67% तेजी, ब्रोकरेजने वाढवले टारगेट प्राइस...

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या शेअर्समध्ये सध्या चांगली वाढ दिसून येत आहे. झोमॅटोच्या शेअर्सवर ब्रोकरेज कंपन्याही तेजीत दिसत आहेत. अशात ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने झोमॅटोच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची आशा व्यक्त केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या शेअर्समध्ये सध्या चांगली वाढ दिसून येत आहे. झोमॅटोच्या शेअर्सवर ब्रोकरेज कंपन्याही तेजीत दिसत आहेत. अशात ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने झोमॅटोच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची आशा व्यक्त केली आहे. सध्या हा शेअर 179.50 रुपयांवर ट्रेड करत आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 188.95 रुपये आहे. त्याच वेळी, त्याची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 49 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 1.58 लाख कोटीवर पोहोचले आहे. अलीकडेच झोमॅटोने शाकाहारींसाठी एक नवीन सेवा सुरू केली होती, ज्यामुळे ते चर्चेत होते.

ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने झोमॅटोच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची आशा व्यक्त केली आहे. 25 मार्च 2024 च्या रिसर्ट रिपोर्टमध्ये ब्रोकरेजने स्टॉकला बाय रेटिंग दिले आहे आणि त्याचे टारगेट वाढवले आहे. ब्रोकरेजने स्टॉकचे टारगेट 182 रुपयांवरून 300 रुपये केले आहे. त्यानुसार कंपनीच्या शेअर्समध्ये 67 टक्क्यांपर्यंत मोठी तेजी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत झोमॅटोने जोरदार निकाल सादर केले आहेत. डिसेंबर तिमाहीत कंपनीने 138 कोटीचा निव्वळ नफा नोंदवला आहे. त्याचबरोबर कंपनीच्या महसुलातही वाढ झाली आहे. कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 69 टक्क्यांनी वाढून 3288 कोटी झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 347 कोटीचा तोटा आणि 1948 कोटीचा महसूल मिळाला होता.

गेल्या एका वर्षात झोमॅटोच्या शेअर्समध्ये सुमारे 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत 80 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे. या वर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये 44 टक्के तेजी आली आहे. एवढेच नाही तर गेल्या वर्षभरात 257 टक्के बंपर नफा कमावला आहे. अशात आयसीआयसीआय सिक्युरिटीजने 182 रुपयांवरून 300 रुपर्यांपर्यंत वाढवले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT