satirical-news

ढिंग टांग! : देवस्थान!

ब्रिटिश नंदी

घाटावरले सुरेख राऊळ 
चिरेबंदीवर सोनकळस 
पुढ्यात आहे घाट उतरता 
मागील रानामध्ये पळस 

आवारामधी उंच उभी अन्‌ 
लेकुरवाळी ती दीपमाळ 
स्वच्छ पटांगण आरसपानी 
गजबजलेला गावरहाळ 

फुलवाल्यांचे मृदू हाकारे 
तबकामध्ये गेंदफुले 
हारतुरे दुरवा, फुलपत्री 
भक्तांची बा रांग डुले 

कुठे लोंबती इष्ट दुकानी 
करदोट्याच्या कृष्णसरी 
मूर्ति चिमुकल्या, प्रसादलाह्या, 
पेढे, बर्फी विविध परी 

सूर्य उगवता झळाळतो हा 
किरीट माझ्या गावाचा 
देव आतला कुणा न माहीत 
नाही कुणाच्या नावाचा 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रोज चालते काकडारती 
रोज वाजतो टाळ मृदंग 
रोज घणघणे घंटनादहि 
रोज दाटतो कीर्तन रंग 

गाभाऱ्यामधी रोज कोंदतो 
धूर, धुपाचा गंध खडा 
आणि उद्याच्या निर्माल्यासम 
पुष्पराशिचा पडे सडा 

देव येथला आहे जागृत 
कुणी लावितो त्याला कौल 
आडरातीला दर्शन घेता 
शापवाणीची पडेल भूल 

पंचक्रोशीचे पोट चालते 
देवचि माझा माय नि बाप 
तोच घालतो पोटाला अन्‌ 
दूर सारतो हा भवताप 

सुघड साजिरी सुंदर मूर्ती 
रूप साजरे गे सुकुमार 
दर्शनहेळामात्रे व्हावा 
दूरचि सारा बा शिणभार 

परंतु, घडले आक्रित सारे- 
होत्याचे नव्हते घडले 
राजकारणी आखाड्यामधी 
दैवत माझे सांपडले! 

एके दिवशी बंद जाहले 
देऊळ, त्याचे बंद कवाड 
बंद जाहला घंटनादहि 
अन्‌ नशिबाला भरली धाड 

नवस संपले, कौल निमाले 
जागृत दैवत झाले कैद 
सामसुमीची नवी राजवट 
म्हणते दर्शन असे अवैध 

मंदिर उघडा, कुणी ओरडे 
कुणी दटावे, म्हणते "चूप' ! 
भक्तजनांचा शुष्क उमाळा 
कुणी न घाली त्याला धूप 

देऊळबंदी गाजू लागली, 
राजकारणां आला ऊत 
देव राहिला बाजूला अन्‌ 
"मतवाल्यां'चे जुळले सूत! 

असाच असतो, अगा ईश्वरा 
कलियुगाचा नेम बरा 
तुझ्या पुढ्यातील तबकापेक्षा 
मतपेढीचा गेम खरा! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Customs Duty: भारतातून आणलेल्या सामानावरील शुल्क सवलत वाढली! नेपाळ सरकारचा मोठा निर्णय; सीमेलगतच्या नागरिकांना मोठा फायदा

Krunal Pandya: हार्दिक आणि कृणालमध्ये खरंच दुरावा आला आहे? अखेर मोठ्या भावानेच सांगितले संपूर्ण सत्य, म्हणाला आमच्यात वाद...

Ghodegaon Crime : जुन्या वादातून आयटीआय वसतिगृहात तरुणाला संपविले; पोलिसांकडून काही तासांतच आरोपीला बेड्या

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गावी गेलेल्या कुटूंबाचा टेम्पोखाली चिरडून मृत्यू

Mumbai News: दिल्लीतील अग्निकांडानंतर मुंबई फायर ब्रिगेड सतर्क, हॉटेलांवर 'अग्निशमन'ची करडी नजर

SCROLL FOR NEXT