Horoscope and Astrology Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 24 जुलै 2021

पंचांग - शनिवार : आषाढ शुद्ध १५/कृष्ण १, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, चंद्रोदय सायंकाळी ७.४४, चंद्रास्त सकाळी ६.४५, सूर्योदय ६.१०, सूर्यास्त ७.११, इष्टी, पौर्णिमा समाप्ती सकाळी ८.०७, भारतीय सौर श्रावण २ शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शनिवार : आषाढ शुद्ध १५/कृष्ण १, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, चंद्रोदय सायंकाळी ७.४४, चंद्रास्त सकाळी ६.४५, सूर्योदय ६.१०, सूर्यास्त ७.११, इष्टी, पौर्णिमा समाप्ती सकाळी ८.०७, भारतीय सौर श्रावण २ शके १९४३.

दिनविशेष -

१९३२ - अभिनेते, नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते अशा चतुर्विध भूमिकांमुळे मराठी नाट्यरसिकांच्या मनात स्वत:चे खास स्थान निर्माण केलेले ज्येष्ठ रंगकर्मी प्रा.मधुकर तोरडमल यांचा जन्म. ‘भोवरा’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘ऋणानुबंध’, ‘गुड बाय डॉक्‍टर’ ही त्यांची स्वत:ची नाटके खूपच गाजली. नाट्यगौरव, राज्य पुरस्कार, काशिनाथ घाणेकर पुरस्कार, विष्णुदास भावे पुरस्कार आदींनी त्यांना गौरविण्यात आले.

१९९७ - माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक (कै.) अरुणा असफअली यांना स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला.

१९९७ - ख्यातनाम बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना पत्रकारिता, साहित्य व सर्जनशील संपर्क कला या माध्यमांतील कामगिरीसाठी ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर.

२००१ - जपान येथील जागतिक जलतरण स्पर्धेत भारताच्या शिखा टंडनने महिलांच्या १०० मी. फ्री स्टाईलचे अंतर ५९.९६ सेकंदात पार केले.

दिनमान -

मेष : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

वृषभ : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मिथुन : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

कर्क : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

सिंह : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कन्या : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

धनु : व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. जुनी येणी वसूल होतील.

मकर : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कुंभ : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आध्यात्माकडे कल राहील.

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! सहकारी टॅक्सी सेवेसाठी सरकार नवे नियम आणणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले तातडीचे आदेश

Shirur Firing Case : करडे घाटात झालेल्या अंदाधूंद गोळीबार प्रकरणानंतर अलर्ट झालेल्या पोलिस दलाने नामचीन गुंडांची धरपकड केली सुरू

Mumbai: पूरमुक्त मुंबई करणार म्हणणाऱ्या BMCला पहिल्याच पावसात धप्पा, अंधेरी सबवे पाण्यात, VIDEO VIRAL

Panhala Tourism Tax : पन्हाळागडावर पर्यटकांची उघड लूट? पर्यटन कराच्या नावाखाली वर्षाकाठी 5 ते 7 लाखांचा घोळ; 'या' गोष्टीमुळे संशय वाढला!

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी प्रशासनाचा मोठा प्लॅन! तब्बल 4,500 बसेस धावणार, दररोज 33 लाख भाविक करणार प्रवास

SCROLL FOR NEXT