सातारा

गुड न्यूज! कोरोनाकाळात केंद्राचा ग्रामपंचायतींना मोठा दिलासा; खात्यावर तब्बल 45 कोटींचा निधी जमा

उमेश बांबरे

सातारा : पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना मिळालेल्या निधीचा पहिला हप्ता या आठवड्यात ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा होणार आहे. यासाठीची प्रक्रिया सध्या ग्रामपंचायत विभागात सुरू आहे. या निधीतून 50 टक्के निधी पाणीपुरवठा, जलपुर्नभरण व इतर कामांसाठी खर्च करायचा असून, उर्वरित निधी हा ग्रामपंचायतींनी केलेल्या आराखड्यातील कामांवर खर्च होणार आहे.
 
पंधराव्या वित्त आयोगातून करायच्या कामांसाठी ग्रामपंचायतींनी आराखडा तयार करून तो जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे पाठविला होता. त्यानुसार केंद्र सरकारने पहिला हप्ता म्हणून जिल्ह्याला तब्बल 56 कोटी 70 लाख 43 हजार रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. त्यापैकी 80 टक्के निधी ग्रामपंचायतींना, तर उर्वरित दहा- दहा टक्के निधी हा पंचायत समिती व जिल्हा परिषदेला दिला जाणार आहे. त्यानुसार 45 कोटी 36 लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतींना, तर दहा टक्केप्रमाणे 5.67 कोटी रुपये प्रत्येक पंचायत समिती व जिल्हा परिषदेला मिळणार आहेत. शासनाकडून हा निधी उपलब्ध झाला असून, हा निधी ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. 

येत्या आवडाभरात हा निधी ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यातून 50 टक्के निधी हा पाणी व्यवस्थापन, स्वच्छता व जल पुनर्भरणावर खर्च करायचा आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींनी जल पुनर्भरण, पाणीपुरवठा योजना व स्वच्छतेसाठीच्या उपाययोजना करण्याची कामे आराखड्यात समाविष्ठ केलेली आहेत. त्यानंतर उर्वरित 50 टक्के निधी हा ग्रामपंचायतीने ठरविलेल्या आराखड्यातील विविध विकासकामांवर खर्च करावयाचा आहे. दरम्यान, पंधराव्या वित्त आयोगाचा निधी ऐन कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर उपलब्ध झाल्यामुळे ग्रामपंचायती अंतर्गत आराखड्यांतील कामांना आता वेग येणार आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT