सातारा

...म्हणून मुख्याधिकारीपदी अभिजित बापट पुन्हा साताऱ्याला मिळाले

प्रवीण जाधव

सातारा : सोलापूर महापालिकेचे उपायुक्त अभिजित बापट यांची सातारा पालिकेच्या मुख्याधिकारीपदी वर्णी लागली आहे. अवघ्या महिनाभरात मुख्याधिकारी रंजना गगे यांच्या बदलीमुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
जिलेबीचा गोडवा, कोरोनामुळे कडवा...  

मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या बदलीनंतर दोन जुलै रोजी रंजना गगे सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा भार सांभाळला होता. लक्ष्मीटेकडी परिसरात कायद्याचा बडगा दाखवून त्यांनी केलेल्या ऍण्टीजेन टेस्ट कामाची चांगलीच चर्चा झाली. त्यामुळे तेथील कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले. कामचुकार अधिकाऱ्यांना शिस्तीचा चाप लावण्यात त्यांनी कसूर केली नाही.

कास पठारावरील रस्ता बंद होणार? मूठभर धनिकांच्या प्रयत्नांची चर्चा  

प्रशासकीय कारभाराचे गाडे सुरळीत करत असताना रंजना गगे यांच्या जागी सोलापूर महापालिकेचे उपायुक्त म्हणून अभिजित बापट यांची प्रशासकीय बदली झाल्याचे नगरविकास विभागाकडून लेखी पत्र मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाले. 2012 ते 16 या चार वर्षात बापट यांनी आधी साताऱ्यात नगर प्रशासन अधिकारी म्हणून आणि त्यानंतर तीन वर्ष सातारा पालिका मुख्याधिकारी म्हणून सेवा बजावली होती.

शेतीत रमला उच्चपदस्थ युवा अभियंता  

खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी उत्तम समन्वय असणारे मुख्याधिकारी म्हणून अभिजित बापट यांची ओळख आहे. मुख्याधिकारी गगे यांच्या प्रशासकीय सेवेचे 22 महिने शिल्लक होते. त्यांनी सुद्धा पुणे विभागात बदली मिळावी, यासाठी विनंती अर्ज नगर विकास विभागाकडे केला होता.

Edited By : Siddharth Latkar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Akkalkot FoodSafety: अक्कलकोटमध्ये गुटखा, अन्नभेसळ, अशुद्ध पाणी व निकृष्ट दूधविक्रीवर धडक कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी

Paithan Irrigation Project: ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील रखडलेले पूल; रस्ते खोदकामामुळे शेतकरी व वाहनधारकांचे हाल

Video : 20 लाखांची गाडी पण मनाने भिकारी! डिझेल भरल्यानंतर ड्रायवर पंपावरून पळाला, पेट्रोल भरणारा कासावीस होऊन मागे धावला अन्...

SCROLL FOR NEXT