सातारा

सातारा जिल्ह्यातील 19 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

प्रविण जाधव

सातारा : जिल्हा परिषदेच्या विविध प्राथमिक मराठी शाळांमधील 19 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र, कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर, तसेच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाल्यामुळे देशभरात राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असल्यामुळे जिल्हास्तरावर होणारा हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. 

दरवर्षी पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर दरवर्षी शिक्षक दिनी ज्या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचा जिल्हास्तरावर पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी 19 शिक्षकांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामध्ये सागर प्रभाकर कांबळे (जिल्हा परिषद शाळा धावडशी, ता. सातारा), सुभाष दत्तात्रय जाधव (जिल्हा परिषद शाळा कटापूर, ता. कोरेगाव), सुजाता सतीश कुंभार (जिल्हा परिषद शाळा गोसावीवाडी, ता. माण), शिवाजी भाऊसाहेब कदम (जिल्हा परिषद शाळा कुळकजाई, ता. माण), विष्णू जोतिराम पांचागणे (जिल्हा परिषद शाळा बुधावलेवाडी, ता. खटाव), आबासाहेब तात्याबा जाधव (जिल्हा परिषद शाळा होळीचागाव, ता. खटाव), सचिन सुरसिंग खराडे (जिल्हा परिषद शाळा निंभोरे, ता. फलटण), गणेश भगवान तांबे (जिल्हा परिषद शाळा कारंडेवस्ती, मलवडी, ता. माण) यांचा समावेश आहे.

तसेच दत्तात्रय किसन चव्हाण (जिल्हा परिषद शाळा शिरवळ मुली, ता. खंडाळा) अंजना राजेश जगताप (जिल्हा परिषद शाळा लोणी, ता. खंडाळा), महेश बबन संकपाळ (जिल्हा परिषद शाळा धावडी, ता. वाई), संजय लक्ष्मण लोखंडे (जिल्हा परिषद शाळा खानापूर, ता. वाई), सुभाष काशिनाथ दळवी (जिल्हा परिषद शाळा वाघदरे, ता. जावळी), संतोष पांडुरंग लोहार (जिल्हा परिषद शाळा निपाणीमुरा, ता. जावळी), योगिता रामचंद्र बनसोडे (जिल्हा परिषद शाळा मूळगाव, ता. पाटण), विद्या शशिकांत गाढवे (जिल्हा परिषद शाळा घाटेवाडी, ता. पाटण), सुवर्णा संजय शेजवळ (जिल्हा परिषद शाळा कोर्टी, ता. कऱ्हाड), सुरेखा प्रकाश वायदंडे (जिल्हा परिषद शाळा आगाशिवनगर नंबर 1, ता. कऱ्हाड), सुजाता दिलीप ढेबे (जिल्हा परिषद शाळा कुंभरोशी, ता. महाबळेश्वर) यांचाही यात समावेश आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Bhaiyya Mane : ‘आजपासून भैय्या मानेंचा संबंध संपला,’ ४० वर्षे एकत्र असलेल्या भैय्या मानेंवर हसन मुश्रीफांची आगपाखड, भैय्या मानेंचाही पलटवार

IND vs WI : गिल-विराट स्वस्तात बाद, पण रोहित शर्माने केला वर्ल्ड रेकॉर्ड; सचिन तेंडुलकरला टाकले मागे

Abhishek Sharma: अभिषेक शर्माने पाकिस्तानची धुलाई केली, अन् एक-दोन नव्हे तर ६ विक्रम रचले! युवराज-कोहलीच्या खास क्लबमध्ये थेट एन्ट्री

Sugar Mill Opening : साखर कारखाने सुरु करण्यासंदर्भातील राजु शेट्टींची मागणीची मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडुन पाठराखण

लेट पण थेट! 'या' मुलांकाला जन्मलेल्या लोकांचे उशिरा होतात लग्न, लाईफ पार्टनर असा मिळतो की...

SCROLL FOR NEXT