सातारा

Maharashtra Budget 2021 : साता-यातील मेडिकल कॉलेजसाठी भरीव निधी; अजित पवारांची आग्रही भूमिका

उमेश बांबरे

सातारा : उपमुख्यमंत्री तसचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन सातारा मेडिकल कॉलेजसाठी आग्रही भूमिका घेतल्यामुळे निधीसह जागेचा प्रश्‍न मिटला आहे. आजही (साेमवार) राज्यात स्थापित करण्यात येत असलेल्या मेडिकल काॅलेजसाठी भरीव निधी देण्याची ग्वाही अर्थमंत्री पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली.

राज्य सरकारने या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 850 कोटी निधी मंजूर केला आहे. यातून पाटबंधारे विभागाच्या 60 एकर नियोजित जागेत बांधकाम होणार आहे. हे बांधकाम "बांधा, वापरा व हस्तांतरित करा' अर्थात बीओटी तत्त्वावर होणार आहे. तसेच पदनिर्मितीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालयातच यावर्षी मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, जिल्हा रुग्णालयात लेक्‍चर हॉल, प्रयोगशाळा व विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सुसज्ज वसतिगृह नसल्याने ही सुविधा तात्पुरती निर्माण करण्यासाठी सावकार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहे. या कॉलेजमध्ये मेडिकल कॉलेजसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आता मेडिकल कॉलेज सुरू करण्यापूर्वी कौन्सिल ऑफ इंडियाकडून (एमसीआय) तपासणी होते. या तपासणीत खरे उतरण्यासाठीची तयारी सध्या मेडिकल कॉलेजसाठी नेमलेली यंत्रणा करत आहे. या तपासणीत प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रत्यक्ष यंत्रणा उपलब्ध आहे का, याची माहिती घेतली जाते. मगच परवानगी दिली जाते. त्यामुळे साधारण ऑगस्टमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविता येईल, यासाठीची सर्व तयारी आता युध्दपातळीवर सुरू आहे.
 
दरम्यान, कृष्णा खोऱ्याची जागा मेडिकल कॉलेजच्या नावावर झाली असून, या जागेवरील पाटबंधारेच्या जुन्या इमारती हटविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यानंतर बारामतीच्या धर्तीवर येथे सुसज्ज अशी सातारा मेडिकल कॉलेजची इमारत उभी राहणार आहे. ही इमारत उभी राहण्यासाठी साधारण वर्ष-दीड वर्ष जाणार आहे. या कामावर बांधकाम विभाग लक्ष ठेवणार आहे. मेडिकल कॉलेजसोबत महिला रुग्णालयाचेही बांधकाम होणार आहे. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या वर्षीची प्रवेशप्रक्रिया जिल्हा रुग्णालय व सावकार मेडिकल कॉलेजमध्येच होणार आहे. 

लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे गरजेचे 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन सातारा मेडिकल कॉलेजसाठी आग्रही भूमिका घेतल्यामुळे निधीसह जागेचा प्रश्‍न मिटला आहे. आता प्रत्यक्ष प्रक्रिया शक्‍य तितक्‍या वेगाने राबविली जात आहे. तसेच जिल्ह्यातील आमदार व खासदारांनीही मेडिकल कॉलेजसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने हा प्रश्‍न मार्गी लागला आहे. आता ऑगस्टमध्ये प्रवेशप्रक्रिया कशी सुरू होईल, यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

खाकीच्या डाेळ्यातून ओघळले अश्रु; आईसह मुलगा जळून खाक

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT