Atul Bhosale esakal
सातारा

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादांशी चर्चा करुन भूमिका जाहीर करणार

जिल्हा बँकेत भाजपला विश्वासात घेतल्याशिवाय 'समीकरण' होणार नाही

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (Satara Co-operative Bank Election) भाजपला विश्वासात घेतल्याशिवाय कोणालाच त्याचे 'समीकरण' करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले (BJP General Secretary Atul Bhosale) यांनी मांडलीय. जिल्हा बँक जिल्ह्यातील शिखर संस्था आहे. त्याचे राजकारण करत असताना भाजपचा विचार घेतल्याशिवाय कोणालाही निर्णय घेता येणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केलीय.

राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केलीय. भाजपा नेते भोसले यांनी आज त्यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पक्षाची जिल्ह्यातील ताकद वाढली असून भाजपशिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोणालाच आपले समीकरण करता येणार नाही. भाजपची सहकारातीलही ताकद वाढलीय.

पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी, तसेच जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांबरोबर चर्चा करुन आम्ही भूमिका जाहीर करणार आहोत. सहकार क्षेत्रात पक्षाची ताकद वाढली असल्याने त्याचेही चांगले परिणाम दिसत आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शिखर संस्था असून या संस्थेचे राजकारण करताना भाजपला विचारात घेतल्याशिवाय कोणालाच समीकरण करता येणार नाही. पक्षांच्या नेत्यांचा जो आदेश असेल, त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेवू. त्यानंतरच आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असे स्पष्ट मतही अतुल भोसले यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip BJP Leader Statement : कथित ऑडिओ क्लिपवर प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यानंतर भाजपच्या मोठ्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

IND A vs NZ A Live: लोकेश राहुल ०, यशस्वी जैस्वाल १७; भारताचा डाव ११३ धावांवर गडगडला, नागपूरचा यश राठोड एकटा भिडला

Drought Crisis: सरकारी विभागांच्या निधीला कात्री ; दुष्काळाचा फटका; मुख्यमंत्र्यांच्या २० टक्के निधी कपातीच्या सूचना

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा

Belgaum-Kolhapur Direct Railway : सर्वेक्षण झाले, पण प्रत्यक्ष काम कधी? बेळगाव-कोल्हापूर रेल्वेच्या प्रतीक्षेला कंटाळून नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत, जनआंदोलनाचा निर्धार

SCROLL FOR NEXT