Udayanraje Bhosale esakal
सातारा

खासदार उदयनराजेंचा 'तो' ठराव कायम; मतदार यादीवर 46 'आक्षेप'

उमेश बांबरे

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) कच्च्या मतदारयादीवर सुनावणी सुरू असून, यामध्ये खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांच्या नावाचे कोणतेही ठराव रद्द झालेले नाहीत. तसेच जिल्हा बॅंकेनेही त्यांचे कोणतेही ठराव अपात्रतेच्या यादीत टाकलेले नाहीत. त्यांचे गृहनिर्माण आणि पाणीपुरवठा संस्थेतील ठराव योग्य व कायम आहेत, अशी माहिती उदयनराजेंचे समर्थक व माजी सभापती सुनील काटकर (Sunil Katkar) यांनी दिली.

बँकेच्या निवडणुकीसाठी कच्च्या मतदारयादीवर सुनावणी सुरू आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीवर ४६ आक्षेप दाखल आहेत. यामध्ये सर्वाधिक १९ आक्षेप सोसायटीच्या ठरावांवर आहेत. या आक्षेपांवर सुनावणीची प्रक्रिया सध्या विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडून सुरू आहे. यामध्ये गृहनिर्माण संस्था आणि पाणीपुरवठा संस्थेतून खासदार उदयनराजे भोसले यांचे ठराव केलेले आहेत. यापैकी पाणीपुरवठा संस्थेतील ठराव जिल्हा बँकेने अपात्र ठरावाच्या यादीत टाकल्याचे विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले होते.

याविषयी सुनील काटकर यांनी सांगितले, की उदयनराजेंचा कोणताही ठराव जिल्हा बँकेने अपात्रतेच्या यादीत टाकलेला नाही. त्यामुळे खासदार उदयनराजेंचा पाणीपुरवठा संस्थेतील कोणताही ठराव रद्द केलेला नाही. त्यांचे गृहनिर्माण आणि पाणीपुरवठा संस्थेतून केलेले सर्व ठराव योग्य असून, ते पात्र ठरावांच्या यादीतच आहेत. त्यामुळे त्यांचे कोणतेही ठराव रद्द अथवा अपात्र केलेले नाहीत, असे श्री. काटकर यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT