Udayanraje Bhosale vs Sharad Pawar esakal
सातारा

'ज्येष्ठ नेते शरद पवार, मनोज जरांगे, लक्ष्मण हाकेंनी राजकारण करू नये'; आरक्षणावरुन उदयनराजेंचं स्पष्ट मत

उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी केली.

सकाळ डिजिटल टीम

''मुळात जातीनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. त्यातून कोणत्या जातीची लोकसंख्या किती त्यानुसार आरक्षण देता येईल.''

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी केली. राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), मनोज जरांगे-पाटील, प्रा. लक्ष्मण हाके यांनी राजकारण करू नये. त्यापेक्षा एकत्रित येऊन मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक करावी व आरक्षण प्रश्नातून मार्ग काढावा. त्यातूनच कोण राजकारण करतंय आणि कोण नाही, हे लोकांना कळेल, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी केली. त्यानंतर दिल्लीतील निवासस्थानी उदयनराजे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकारण करू नये, असा सल्ला प्रमुख नेत्यांना दिला आहे.

उदयनराजे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव प्रत्येक जण घेत असतो; पण आज विविध जातीय तेढ निर्माण झाला आहे. मुळात जातीनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. त्यातून कोणत्या जातीची लोकसंख्या किती त्यानुसार आरक्षण देता येईल. आज जी परिस्थिती पाहायला मिळतेय ती खास करून राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार, मनोज जरांगे-पाटील, लक्ष्मण हाके असतील. या लोकांनी राजकारण करू नये. त्यापेक्षा एकत्रित येऊन मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक करावी व मार्ग काढावा. त्यातून कोण राजकारण करतंय आणि कोण नाही, हे लोकांना कळेल.’’

जरांगे यांच्याकडून होणाऱ्या विविध वक्तव्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता उदयनराजे म्हणाले, ‘‘त्याबद्दल न बोललेले बरे; पण सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय करणे आवश्यक आहे. घटना सोडून कोणीही आरक्षण देऊ शकत नाही. शरद पवार, हाके किंवा जरांगे-पाटील असतील, यांच्याकडे असा काही मार्ग असेल तर त्यांनी सांगावा.’’ जरांगे पाटलांना तुम्ही काय सल्ला द्याल, यावर ते म्हणाले, ‘‘मी काय सल्ला देणार. मी सल्ला देण्याइतका मोठा नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT