सातारा

कासव चोरणं पडलं महाग, पोलिसांनी चोरट्यांना विचारला जाब!

प्रविण जाधव

सातारा : दोन दिवसांपूर्वी वाईतील खवले मांजर तस्करीप्रकरण ताजे असतानाच, आता कासव तस्करी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) वाठार किरोली (ता. कोरेगाव) येथे जेरबंद केले आहे. प्रकाश अधिकराव चव्हाण (वय 28, रा. किरोली, ता. कोरेगाव) व सतीश भगवान साळवे (वय 30, वाठार, ता. कोरेगाव) अशी त्यांची नावे आहेत. 

वाठार किरोली परिसरात दोन युवक कासव विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी हवालदार विनोद गायकवाड यांच्या पथकाला याबाबतची कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हे पथक वाठार किरोली परिसरात गेले. तेथील बेघर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ दोन युवक हातात पिशवी घेऊन संशयास्पद फिरत असल्याने त्यांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. त्या वेळी त्यांच्या जवळील पिशवीमध्ये अडीच लाख रुपये किमतीचे दुर्मीळ कासव आढळून आले. पोलिसांनी दोन्ही संशयित व कासव कोरेगाव वनक्षेत्रपाल यांच्याकडे पुढील कारवाईसाठी दिले आहे. या कारवाईत निरीक्षक सर्जेराव पाटील, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, ज्योतीराम बर्गे, हवालदार विनोद गायकवाड, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, प्रवीण कडव, मयुर देशमुख हे सहभागी होते.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

SCROLL FOR NEXT