सातारा

कऱ्हाड ः विमा कंपनीच्या अधिकाऱ्यास लाखाला फसविले

हेमंत पवार

कऱ्हाड ः येथील एका विमा कंपनीच्या अधिकाऱ्याची एक लाखाची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे गुरुवारी (ता.13) उघडकीस आले. त्यांच्या क्रेडिट कार्डची कॅश लिमिट वाढवून देण्याचा बहाणा करत भामट्याने एक लाखाला गंडा घातला आहे. सोमवारी (ता. 10) दुपारी हा प्रकार घडला. त्याबाबत अंकुश रासकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी सांगितले, की येथील ओरियंटल इन्शुरन्स कंपनीत श्री. रासकर प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांचे सातारा येथील ऍक्‍सिस बॅंकेत बचत खाते आहे. त्या खात्यावर त्यांनी क्रेडिट कार्ड काढले आहे. ते पाच वर्षांपासून कार्यरत आहे. बहुतांशी वेळा त्यांनी पेट्रोल भरण्यासाठी त्याचा वापर केला आहे. तीन दिवसांपूर्वी सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ते घरी निघाले होते. त्या वेळी त्यांनी मोबाईलवर कॉल आला. त्यांनी ऍक्‍सिस बॅंक क्रेडिट कार्य विभागातून बोलत असल्याचे सांगितले. समोरील व्यक्तीने तुमच्याकडे असणाऱ्या क्रेडिट कार्डचे कॅश लिमिट वाढवून देतो, असे सांगितले. त्या वेळी रासकर यांनी मला त्यात रस नाही, तशी वाढही करायची नाही, असे सांगून कॉल कट केला, तरीही त्यांना अनोळखी मोबाईलवरून वारंवार फोन येत होते.

थकीत रक्कम वसूलीसाठी कऱ्हाड पालिकेकडून 17 गाळे सील

त्या वेळी ते गाडी चालवित होते. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. घरी आल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास फोन पाहिला असता त्यांना मोबाईलवर ऍक्‍सिस बॅंकेचे मॅसेज आला. तो मॅसेज वाचताना क्रेडिट कार्डवरून एका अनोळखी नावावर 99 हजार रुपये जमा झाल्याचा संदेश त्यांना दिसला. श्री. रासकर यांनी त्वरित ऍक्‍सेस बॅंकेत जाऊन खात्री केली. त्या वेळी त्यांच्या खात्यातून 99 हजार रुपये दुसऱ्याच्या नावावर वर्ग झाल्याची खात्री झाली. त्यानंतर लगेच क्रेडिट कार्ड बंद केले. त्याबाबत त्यांनी गुरुवारी (ता.13) शहर पोलिसात त्याची फिर्याद दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान, श्रीलंका ते अमेरिका... जगभरातील लोक भारताकडे कसं बघतात? सर्वात मोठा सर्व्हे समोर

लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा! ध्वजारोहणापासून भाषणापर्यंत... १५ ऑगस्टला काय-काय घडणार? वाचा मिनिट-टू-मिनिट वेळापत्रक

R. Ashwin: अश्विन क्रिकेटवर बोलत होता अन् अचानक घराबाहेर पोलीस आले; फोन उचलताच समोर आलं ‘ते’ कारण...

Success Story: 1.5 लाखांची नोकरी सोडली; देशी कोंबड्यांच्या व्यवसायातून आता वर्षाला 36 लाखांचा नफा!

Marathi News Live Updates : टीएमसीच्या माजी आमदारावर जमावाचा संताप; कोर्टात नेत असताना फेकली अंडी

SCROLL FOR NEXT