सातारा

कोल्हापुरातील ऍट्रॉसिटी गुन्हा मागे घेण्यासाठी लाखोंच्या खंडणीची मागणी

प्रविण जाधव

सातारा : ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर तो मागे घेण्यासाठी 8.40 लाख रुपये खंडणी उकळल्यानंतर आणखी दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी साताऱ्यातील एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रकांत साठे असे खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून, शनिवारी (ता. ५) रात्री उशिरापर्यंत त्याला अटक झाली नव्हती. 

याबाबतची अधिक माहिती अशी, की शंकरराव गुलाबराव निंबाळकर (रा. गडकर आळी, शाहूपुरी, सातारा) यांच्याविरोधात चंद्रकांत दादासाहेब साठे ऊर्फ बाळू साठे (रा. शाहू बोर्डिंगजवळ, व्यंकटपुरा पेठ, सातारा) याने कोल्हापूर येथील एका पोलिस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा मागे घेण्यासाठी त्याने शंकरराव निंबाळकर यांच्याकडून गेल्या काही दिवसांत 8.40 लाख रुपये घेतले आहेत. एवढे पैसे घेतल्यानंतरही चंद्रकात साठे याने गुन्हा मागे घेतलेला नाही. 

दरम्यान, हा गुन्हा मागे घ्यावा म्हणून चंद्रकांत साठे याने निंबाळकर यांच्याकडे आणखी दोन लाख रुपयांची मागणी केली. हे पैसे दिले तर मी गुन्हा मागे घेतो, असेही त्याने सांगितले. मात्र, चंद्रकांत साठे याच्या वारंवार खंडणी मागण्याच्या त्रासाला कंटाळून शंकरराव निंबाळकर यांनी शुक्रवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार पोलिसांनी चंद्रकांत दादासाहेब साठे ऊर्फ बाळू साठे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आली नव्हती. अधिक तपास हवालदार मोहरे करत आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

SCROLL FOR NEXT