सातारा

नवरात्रोत्सवात भुईंजमध्ये भाविकांना प्रवेशबंदी : देवस्थान ट्रस्टचा निर्णय

विलास साळुंखे

भुईंज (जि. सातारा) : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचा शारदीय नवरात्र महोत्सव कोरोना साथीच्या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन साध्या पध्दतीने आणि भाविकांविना साजरा होणार आहे. या कालावधीत भुईंज गावाबाहेरील भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती श्री महालक्ष्मीदेवी व इतर देव-देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर भोसले, मार्गदर्शक विश्वस्त गजानन भोसले, भाऊसाहेब जाधवराव यांनी दिली आहे. 

17 सप्टेंबर रोजी घटस्थापनेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असून, 25 सप्टेंबर रोजी दसरा विजयादशमी दिवशी सांगता होते. विजयादशमीला गावची वार्षिक यात्रा असल्याने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात व्यवसायानिमित्त विस्थापित असलेले भुईंजचे नागरिक या दिवसाची वर्षभर वाट पाहात असतात. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांच्या उत्साहावर विरजण येणार आहे. मात्र, नवरात्रातील धार्मिक विधी आणि कुलाचार परंपरेप्रमाणे साजरे करण्यात येणार आहेत. या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी भुईंज गावात वाहनाने अथवा पायी प्रवेश दिला जाणार नाही. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता परिसरातील नागरिकांना किंवा भाविकांना महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 

या कालावधीत नवस, पूजा आदींना प्रतिबंध करण्यात आला आहे. देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवात पूर्वंपार प्रथेप्रमाणे होणारे कुलाचार, धार्मिक विधी करण्यासाठी आवश्‍यक ते पुजारी, महंत, सेवेकरी आणि मानकरी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. नवरात्र कालावधीत मंदिर ट्रस्टकडून शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रॅपिड ऍन्टीजेन टेस्टचा पडताळणीसाठी अवलंब केला जाणार आहे. दैनंदिन निर्जंतुकीकरण, सुरक्षित अंतराचे पालन, मास्क आणि सॅनिटायझर यांचा वापर सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. "घरी राहा, सुरक्षित राहा' या संकल्पेतून नवरात्रोत्सवात भुईंज परिसरातील भाविकांनी तसेच ग्रामस्थांनी मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री महालक्ष्मीदेवी व इतर देव-देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

 संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash Investigation : अजितदादांच्या अपघाताला जबाबदार VSR विमान कंपनीची सखोल चौकशी होणार, सीआयडीने पाठवले पत्र

Kagal MIDC Crime News : होळीच्या जल्लोषातून दारू पिऊन तरुणाचा लोखंडी पाइपने केला खून; कागल पंचतारांकित एमआयडीसीतील घटना; दोघांविरोधात गुन्हा दाखल

EPFO Update: PF धारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय! PF वर मिळणार FD पेक्षाही जास्त व्याज; कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिलासा

Baramati Tragic Accident : बारामतीत एका क्षणात हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; मायलेकीचा जागीच मृत्यू, वडिलांसह दोन वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी

Holi 2026: या गावात ६०० वर्षांपासून खेळली जाते रंगहीन होळी; एक आठवड्याने साजरा होतो सण, कारण वाचून अंगावर काटा येईल

SCROLL FOR NEXT