सातारा

गुढी पाडव्याच्या खरेदीसाठी साता-यात नागरिकांची गर्दी; क-हाडात 30 व्यापा-यांवर कारवाई

सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

सातारा : वीकेंड लाॅकडाउन संपल्यानंतर आज (साेमवार) साता-यातील बाजारपेठेत नागरिकांची विविध वस्तू घेण्यासाठी गर्दी झाली आहे. यामध्ये राजवाडा , माेती चाैक , पाेवई नाका परिसरात गुढी पाडव्याच्या पार्श्वभुमीवर गुढी उभारण्यासाठी आवश्यक असणारे कळक, साखरेची गाठी, फुलांच्या माळा खरेदीसाठी गर्दी हाेती. काही ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन केले जात हाेते तर काही ठिकाणी अजिबातच नव्हते. 

उद्या (मंगळवार) गुढीपाडवा सण साजरा केला जाणार आहे. या सणासाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी झाली हाेती. या साहित्याबराेबरच किराणा माल दुकानांत देखील वेगवेगळ्या वस्तु खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी हाेती. बहतांश ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन केले जात हाेते. साता-यातील राजपथावर वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतुक पाेलिसांना आज चक्क वाहतुक नियंत्रण करावे लागले. 

Weekend Lockdown Effect : किराणा, औषध दुकानदारांसह किरकाेळ व्यावसायिक बनले लुटारु; सातारकरांची फौजदारीची मागणी 

याबराेबरच पुसेगाव , काशिळ येथील बाजार पेठेत ग्रामस्थांची गर्दी हाेती. पुसेगावातील बाजारपेठेत भाजी खरेदीसाठी माेठ्या प्रमाणात गर्दी झाली हाेती. केळघर येथे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद असून ग्राहकांची गर्दी देखील कमी आहे. दहिवडीत बाजार पटांगण परिसरात खरेदीसाठी गर्दी आहे.

कऱ्हाडात  30 व्यापाऱ्यांवर कारवाई

कऱ्हाड : विकेंड लॉकडाउननंतर शहरात सुरू झालेली बाजारपेठ पोलिस, महसूल व पालिकेच्या वेगवेगळ्या पथकांनी आज (साेमवार) बंद केली. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद करण्यात आली. चार वेगवेगळ्या पथकाने 30 व्यापाऱ्यांवर कारवाई केली. 

तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलिस उपाधीक्षक रणजीत पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके व पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील या चारही अधिकाऱ्यांनी शहरात फिरून कारवाई केली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. अन्य दुकाने बंद ठेवण्याचे ते स्पष्ट करत होते. त्यावरून व्यापारी व पथकांमध्ये किरकोळ वादही झाला. 

जिल्हाधिकारी साहेब! बगाड यात्रेतील धाेका टाळण्यासाठी बावधनसह वाड्यावस्त्यांवरील प्रत्येकाची काेराेनाची चाचणी करा 

विकेंड लाॅकडाउनंतर नेहमीप्रमाणे सकाळी बाजारपेठ खुली झाली. मात्र जिल्हाधिकारी सिंह यांच्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील,  त्यामुळे आदेशानुसार. पालिका, महसूल व पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद केली. त्यावेळी आदेश न पाळणाऱ्या तीस जणांवर कारवाई झाली. त्यातील काहींना दंड तर काहींचे दुकाने सात दिवस बंद ठेवण्याची कारवाई झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT