सातारा

जयकुमार गोरेंच्या मागणीची शिक्षणमंत्र्यांकडून दखल; शिक्षण विभागात खळबळ

विशाल गुंजवटे

बिजवडी (जि. सातारा) : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षकांच्या केलेल्या बदल्यांत अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आमदार जयकुमार गोरे यांनी लेखी शिक्षणमंत्र्यांकडे केली होती. या तक्रारीची तत्काळ दखल घेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. 

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबत फेब्रुवारी 2017 मध्ये शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला होता. सर्व शिक्षकांच्या बदल्या त्यांच्या सोयीनुसार मानवी हस्तक्षेपाशिवाय आणि पारदर्शीपणे करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. या शासन निर्णयाद्वारे संवर्ग 1, संवर्ग 2, संवर्ग 3 आणि संवर्ग 4 असे भाग करून प्रत्येक संवर्गामध्ये कोणते शिक्षक बदलीपात्र ठरतात. या बाबतीत मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित करण्यात आली होती. 

जे शिक्षक बदलीपात्र ठरतील. त्यांच्याच या बदली प्रक्रियेमध्ये समावेश करण्याचे आदेश देण्यात आले होते. शासनाने या वर्षी प्रशासकीय बदल्या रद्द करून फक्त विनंती बदल्या कराव्यात, असा आदेश 5 जुलैच्या पत्राद्वारे देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेने या वर्षी शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या 10 ऑगस्ट रोजी केल्या आहेत. या बदल्या करताना जिल्हा परिषदेने फेब्रुवारी 2017 चा शासन निर्णय आणि त्यानंतर याबाबत आलेली परिपत्रके, निर्णयांचा भंग केला आहे. 

न्यायालयाचा आदेश आहे, असे सांगून 12 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या चुकीच्या आणि नियमबाह्य बदल्या कशाच्या आधारे केल्या, याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, या आशयाचे पत्र आमदार गोरे यांनी मंत्री गायकवाड यांना दिले होते. मंत्री गायकवाड यांनी या पत्राची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने राबविलेल्या बदली प्रक्रियेची तत्काळ चौकशी करुन अहवाल सादर करण्याचा आदेश दिल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT