Prithviraj Chavan esakal
सातारा

मुस्लिमांना आरक्षण द्या; 'काँग्रेस'चे माजी मुख्यमंत्र्यांना साकडे

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मुस्लिमांना दिलेले आरक्षण मागे पडले. ते आरक्षण पुन्हा मिळावे, यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न करावेत, या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या (Muslim Community) शिष्टमंडळाने दिल्लीत आमदार चव्हाण यांची भेट घेतली. या वेळी काँग्रेसच्या (Congress) अल्पसंख्याक विभागाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. त्यात राज्याचे उपाध्यक्ष इब्राहिम शेख, विदर्भ विभागाचे अध्यक्ष ओयस कादरी, औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष अहमद चाऊस, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष अहमद जब्बार, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नदीम मुजावर, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष झाकीर पठाण आदी उपस्थित होते.

आमदार चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मराठा समाजाला १६ टक्के, तर मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिले होते.

आमदार चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मराठा समाजाला (Maratha Reservation) १६ टक्के, तर मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिले होते; पण कालांतराने आरक्षणाला आव्हान दिल्याने त्याला स्थगिती मिळाली. भाजपच्या काळात दोन्ही आरक्षण रद्द झाली. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना आमदार चव्हाण यांच्या सरकारचा आहे तसा अहवाल विधानसभेत मांडला व नंतर पारित करून मंजूर केला. त्यामध्ये मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा कोणताही उल्लेख नव्हता. ते आरक्षण पुन्हा द्यावे, यासाठी मुस्लिम समाजातील शिष्ठमंडळाने आमदार चव्हाण यांच्याशी संवाद साधला.

आरक्षण पुन्हा आपल्या प्रयत्नातून मुस्लिम समाजाला मिळावे, यासाठी आपला प्रयत्न व्हावा, अशी विनंती शिष्टमंडळाने आमदार चव्हाण यांच्याकडे केली. या वेळी आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘माझ्या काळात राणे समिती गठीत केली होती. त्या समितीने दोन्ही समाजाचा सखोल अभ्यास करून अहवाल तयार केला. मराठा समाजासह मुस्लिम समाजाला त्यानुसार आरक्षण दिले गेले; पण पुढील सरकारच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे आरक्षण अस्तित्वात आले नाही. आम्ही आरक्षण दिल्यानंतर काहींना फायदा झाला; पण नंतर आव्हान दिले गेले. पुन्हा एकदा आरक्षणासाठी समाजाने एकत्र राहात विचारांची व न्यायालयीन लढाई करून आरक्षण मिळविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी माझे सहकार्य कायमच राहील व मी प्रयत्नशीलही राहीन.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT