सातारा

पळशी ग्रामपंचायतीत मोठा 'भ्रष्टाचार'; सीईओंकडे चौकशीची मागणी

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : पळशी (ता. माण) ग्रामपंचायतीच्या सरपंच शंकर देवकुळे, उपसरपंच सुनील खाडे आणि ग्रामसेवक देवकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून विकास कामाच्या निधीत मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नीता लक्ष्मण खाडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

ग्रामपंचायतीला 14 व्या वित्त आयोगाचा 30 ते 35 लाख रुपयाचा निधी येतो. सरपंच, उपसरपंच यांनी ग्रामपंचायतीची कायदेशीर कार्यवाही न करता मनमानी कारभार करून या निधीमधून 50 लाखाचा अपहार केला आहे. सरपंच, उपसरपंच यांनी पदाचा गैरवापर, शासन निर्णयानुसार निविदा प्रक्रिया न करणे, कोणत्याही कामाची जाहिरात न देणे, मासिक सभेत विषय न घेता कामे करणे व ती अपूर्ण ठेवणे असे प्रकार केले आहेत. मुरमीकरण कामे आराखड्यात नसताना या कामावर 20 लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. सरपंच, उपसरपंच यांनी ठराव न घेता मर्जीतल्या लोकांना कामे दिली आहेत. शेतकरी प्रशिक्षण सहलीचे चेक कोणताही (टूर अँड ट्रॅव्हल्स) अनुभव नसणाऱ्या व्यक्तीच्या नावावर काढून पैसे काढले आहेत. हायमास पोल उपसरपंच यांनी स्वतःच्या घरी बसविला आहे. 

मागील दोन वर्षात सिमेंट रस्ते, मुरमीकरण, हायमास पोल, पाईपलाईन व मोटर खरेदी, पेव्हर ब्लॉक आदी कामे केली. त्या पैकी कोणत्याही कामाची निविदा प्रक्रिया केली नाही. त्यामुळे शासन निर्णय 2015 नुसार कामे न केल्याने या कामे बेकायदेशीर ठरवून सर्व कामाची वसुली करावी. सरपंच व उपसरपंच यांनी पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या मर्जीतील मक्तेदार यांना कामे दिली व भ्रष्टाचार केला असल्याने त्यांना पदावरून कमी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नीता खाडे यांनी केली आहे. कामाची एक महिन्याच्या आत चौकशी न केल्यास उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : पुढील ४८ तास महत्त्वाचे ! महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता; 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी

Mumbai Kolhapur Sahyadri Express : सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा कोल्हापूर ते मुंबईपर्यंत सुरू होणार, मध्य रेल्वेकडून माहिती

Latest Marathi News Live Update : हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या मोहरमला १७ जूनपासून सुरुवात

नोकरी वाचविण्यासाठी गुरुजींना ‘टीईटी’च्या 10 संधी! राज्यातील पावणेदोन लाख शिक्षक नाहीत पात्रता परीक्षा उत्तीर्ण; 31 ऑगस्ट 2028 नंतर ‘ही’ कारवाई

आजचे राशिभविष्य - 05 जून 2026

SCROLL FOR NEXT