Lockdown esakal
सातारा

लोकांच्या हाताला कामं नसल्यामुळे पैशांची चणचण; लॉकडाउन शिथिल करा

प्रशांत घाडगे

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याने कडक लॉकडाउन (Lockdown) सुरू आहे. गेल्या आठ दिवसांपासून अनेकांना भाजीपाला, किराणा माल संपल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील लॉकडाउन अंशत: शिथिल करण्याची मागणी साताऱ्यातील विविध संघटनांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (Demand Of Various Organizations To Reduce The Lockdown In Satara To Collector Shekhar Singh)

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कडक लॉकडाउन सुरू आहे. गेल्या आठ दिवसांपासून अनेकांना भाजीपाला, किराणा माल संपल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, श्रमिक मुक्ती दलाच्या युवा आघाडीचे चैतन्य दळवी, युवा राज्य फाउंडेशनचे महारुद्र तिकुंडे, रिपाइं (ए) युवा उपाध्यक्ष सोमनाथ धोत्रे, रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे, रिपाइंचे शहराध्यक्ष जयवंत कांबळे, नंदकुमार जावळे, प्रशांत शिवसरण यांनी श्री. सिंह यांना निवेदन दिले आहे.

जिल्ह्यातील 60 टक्के लोक दारिद्य्ररेषेखालील असल्याने लॉकडाउनच्या काळात अनेक अडचणी उभ्या आहेत. त्यामुळे गेल्या 16 दिवस लॉकडाउनमुळे आर्थिक सामना करत आहोत. लोकांच्या हाताला काम नसल्यामुळे पैशांची चणचण होत आहे. या अडचणींचा विचार करून वंचित घटकांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यासाठी लॉकडाउन अंशत: शिथिल करा, अशी मागणी या संघटनांनी केली आहे.

Demand Of Various Organizations To Reduce The Lockdown In Satara To Collector Shekhar Singh

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT