Navnath Dhawale esakal
सातारा

पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळेंचा राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मान

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कामगिरीबद्दल सन्मान

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाडच्या पोलिस उपाधीक्षपदी काम केलेले व ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे पोलिस उपाधीक्षक असलेल्या नवनाथ ढवळे (Navnath Dhawale) यांना राष्ट्रपती शौर्य पदक (Presidential Medal of Valor) जाहीर झाले आहे. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कामगिरीबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे. श्री. ढवळे २०१५ - १७ या काळात गडचिरोली पोलिस दलात (Gadchiroli Police Force) पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात अनेक मोहिमा यशस्वी केल्या.

पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे.

त्यातील मे २०१७ मध्ये धानोरा उपविभागातील चातगाव पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील हुर्रेकसा जंगल परिसरात ढवळेंसह त्यांच्या पथकाने कुप्रसिद्ध नक्षली रजिता उसेंडी हिचा खत्मा केला. उसेंडी हिच्यावर १३९ गुन्हे दाखल होते. तिला पकडण्यासाठी १६ लाखाचे बक्षिस ठेवण्यात आले होते. ही चकमक तब्बल बारा तास सुरु होती.

नवनाथ ढवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिवाची बाजी लावत ही कामगिरी केली होती. या कामगिरीची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. मुळ अहमदनगर जिल्ह्यातील वडजिरे गावातील असलेल्या ढवळे यांनी कऱ्हाडलाही उत्तम कामगिरी केली होती. त्यानंतर चिपळूणला पोलिस उपाधीक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केलीय. सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे पोलिस उपाधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT