सातारा

Success Story : व्वा रं पठ्ठ्या! स्पर्धा परीक्षेचं शिक्षण घेत युवकाची बटाटा शेतीत विक्रमी कामगिरी

ऋषिकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेले पुसेगाव येथील भूमिपुत्र धनंजय गुरव यांनी तीन एकर क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत बटाट्याची लागवड कमी खर्चात करून विक्रमी उत्पादन घेतले. त्यात त्यांनी खर्च वजा जाता सव्वादोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. 

खरंतर गावात हाताला काम मिळत नाही, शेतीतून जास्त उत्पन्न निघत नाही, कमी शेतीत जास्त सदस्यांचा उदरनिर्वाह होत नाही, शिक्षणाची सोय नाही, अशा एक ना अनेक कारणांमुळे ग्रामीण भागातील शेकडो तरुणांनी शहराचा रस्ता धरला होता. शहरांनीही त्यांना रोजीरोटी देत आपलेसे करून घेतले होते. सणसुद, लग्नकार्य आदी कौटुंबिक कार्यक्रमासाठी येणारी शहरातील ही मंडळी शेतीकामापासून दूरच होती. परंतु, कोरोना संसर्गाच्या काळात शहरातील काम सुरू होण्याची खात्री नसल्याने अर्थार्जनासाठी बहुतांश भूमिपुत्रांनी आपल्या घरच्या शेतीत खरीप हंगामातील नगदी पिके घेतली होती. त्यात त्यांनी चांगले उत्पन्न घेतले असून कोरोनाच्या टाळेबंदीबरोबरच आर्थिक संकटावर मातदेखील केली आहे. 

कोरोनाच्या संकटात सक्तीची सुटी मिळाल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून बटाटा शेती केल्याने वेळ, पैशाची बचत तर झालीच, शिवाय तीन एकरांत 180 क्विंटल उत्पादन मिळाले. साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न झाले असून, खर्च वजा जाता सव्वादोन लाख रुपये नफा मिळाल्याचे श्री. गुरव यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Indian Visa Regulations: परदेशी नागरिकांसाठी भारताचे व्हिसा नियम बदलले; एका चुकीमुळे होऊ शकते मोठी कारवाई!

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

मच्छिंद्र कांबळी यांचं अजरामर 'वस्त्रहरण' नाटक पुन्हा भेटीला येणार; 'हा' कसलेला अभिनेता साकारणार तात्या सरपंच

Latest Marathi News Live Update : गडचिरोली प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT