Congress Party esakal
सातारा

'सन्मानानं 1-2 जागा द्या, अन्यथा काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल'

खटाव, कोरेगाव, कऱ्हाड, वाई तालुक्यांसह दोन संस्था मतदारसंघांतून सहा जागांवर उमेदवार तयार

उमेश बांबरे

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत (Satara Bank election) काँग्रेस पक्षाने (Congress Party) वेगळीच भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सन्मानाने एक ते दोन जागा देण्याची तयारी दर्शविली तर ठिक, अन्यथा काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी खटाव, कोरेगाव, कऱ्हाड, वाई तालुक्यांसह दोन संस्था मतदारसंघातून जुळवाजुळव केलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पॅनेल करताना काँग्रेसला विचारात घ्यावे लागणार आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने वेगळीच भूमिका घेतली आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी यावेळेस सर्वच पक्ष सक्रिय झाले आहेत. पण, ही निवडणूक सर्वांच्या सहकार्याने बिनविरोध करण्याची भूमिका राष्ट्रवादीची आहे. पण, त्यांना महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सामावून घ्यायचे नाही. त्यामुळे प्रत्येक जण राष्ट्रवादीवर दबावतंत्र अवलंबून जिल्हा बॅंकेत आपल्या पक्षाचा संचालक कसा होईल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. अगदी स्थापनेपासून जिल्हा बॅंक ही काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहिली. यामध्ये किसन वीर आबांच्या नंतर काँग्रेसचे नेते (कै.) विलासराव पाटील-उंडाळकरांनी बॅंकेची धुरा सांभाळली. सर्वाधिक कालावधीत त्यांच्याच नेतृत्वाखाली बॅंकेची वाटचाल राहिली. त्यांनी बॅंक उत्तम प्रकारे चालवली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या संचालकांनी बॅंक ताब्यात घेतली.

त्यावेळीही विलासराव पाटील-उंडाळकर व आमदार जयकुमार गोरे हे दोघे काँग्रेसचे संचालक राहिले. पण, आमदार गोरे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला. तर विलासराव पाटील-उंडाळकर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आता त्यांचे चिरंजीव ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना बॅंकेवर संचालक म्हणून घ्यावे, अशी अपेक्षा कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांची आहे, तशीच काँग्रेसच्या नेत्यांचीही आहे. पण, राष्ट्रवादीकडून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना कऱ्हाड विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून बॅंकेवर संचालक म्हणून निवडून यायचे असल्याने या मतदारसंघातून इच्छुक असूनही उदयसिंह पाटील यांना येता येणार नाही. तर दुसरा मतदारसंघ बॅंका- पतसंस्थांचा आहे. पण, त्यालाही राष्ट्रवादीकडून दुजोरा मिळत नाही.

काँग्रेसच्या माध्यमातून खटाव, कऱ्हाड, कोरेगाव, वाई, तसेच बॅंका, पतसंस्था तसेच गृहनिर्माण आणि पाणीपुरवठा मतदारसंघातून उमेदवार देण्याची तयारी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने सर्वसमावेशक पॅनेल करताना काँग्रेसला विचारात घेऊन सन्मानाने एक-दोन जागा द्याव्यात, अशी अपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांची आहे. यामध्ये डावलण्याचा प्रयत्न झाल्यास काँग्रेस पक्ष सर्व मतदारसंघांत उमेदवार देऊन स्वतंत्र पॅनेल टाकण्याचीही तयारी करणार आहे. मग यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला तरी चालेल, अशा भूमिकेत सध्या काँग्रेसचे नेते आहेत. त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रणजितसिंह देशमुख, विराज शिंदे, रतन शिंदे, मनोहर बर्गे आदींनी रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. काँग्रेसच्या मागणीवर राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते काय भूमिका घेणार, यावर निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत काँग्रेसला सन्मानाने सामावून घेऊन संचालकांच्या योग्य जागा दिल्या जाव्यात, अन्यथा काँग्रेस पक्ष या निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल उभे करेल. यासाठी आमची कोरेगाव, वाई, कऱ्हाड, खटाव, तसेच इतर दोन संस्था मतदारसंघांतून तयारी झाली आहे.

-डॉ. सुरेश जाधव, प्रभारी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT