सातारा

सातारा पालिकेत सानुग्रह अनुदानावरुन वादाची ठिणगी; कर्मचाऱ्यांत मतभेद!

गिरीश चव्हाण

सातारा : सातारा पालिकेतील कर्मचाऱ्यांना सानुग्रह देण्याच्या मागणीवरुन दोन संघटनांत मतभेद निर्माण झाले आहेत. याच अनुषंगाने अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या चंद्रकांत खंडाईत यांनी लाल बावटा युनियन कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नात राजकारण करत असल्याचा आरोप पत्रकाव्दारे केला आहे. त्यांनी केलेल्या या आरोपामुळे आगामी काळात सानुग्रह अनुदानावरुन कर्मचारी संघटना आणि पालिका प्रशासनात वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या एका संघटनेला मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाल्याचे पत्र दिले होते. या पत्राला आक्षेप घेत दुसऱ्या संघटनेने पालिकेकडे 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती. दोन संघटनांनी केलेल्या वेगवेगळ्या मागण्यांमुळे प्रशासनाची कोंडी झाली होती. यातच बुधवारी खंडाईत यांनी पत्रक काढत लाल बावटा युनियनच्या कारभारावर टिका केली. यात त्यांनी गेली आठ ते दहा महिने वारंवार प्रशासनाशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न आमच्या संघटनेने मार्गी लावले आहेत. या कामात लाल बावटा युनियनचा कोणताही सहभाग नव्हता आणि नाही.

कोरोना काळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्यांना 30 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती. सध्या पालिकेची आर्थिक स्थिती बेताची असल्याने 15 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची कार्यवाही करता येईल, असे आश्‍वासन बापट यांनी दिले होते. याचबरोबर कालबध्द पदोन्नती व इतर मागण्यांबाबत सुध्दा सकारात्मक चर्चा झाली होती. कोणतेही काम न करता लाल बावटा युनियनने कर्मचाऱ्यांत बुध्दीभेद करत राजकारण सुरु केल्याचा आरोपही खंडाईत यांनी पत्रकात केला आहे. खंडाईत यांच्या पत्रकामुळे आगामी काळात सानुग्रह अनुदान व इतर कारणांवरुन कर्मचारी संघटनांमधील वाद उफाळून येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा; २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT