Dr. Bharat Patankar esakal
सातारा

कृषी विधेयकाविरोधातील बंदमध्‍ये ‘श्रमिक’ सहभागी! डॉ. भारत पाटणकर

सकाऴ वृत्तसेवा

शेतकरी आणि जनता यांची जिद्द, चिकाटीचे दर्शन या आंदोलनाच्‍या माध्‍यमातून पहिल्‍यांदाच दिसून येत आहे.

सातारा: कृषी विधेयकातील तरतुदीमुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार असून, त्‍याचा विरोध करण्‍यासाठी येत्या सोमवारी (ता. २७) पुकारलेल्‍या देशव्‍यापी बंदला श्रमिक मुक्ती दलाने पाठिंबा दिला आहे. या बंदमध्‍ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले आहे.

या बंदसाठी देशभरातील १०० पेक्षा जास्त असंघटित कामगार, विद्यार्थी, कर्मचारी, महिला प्राध्यापकांच्या विविध संघटना पुढे आल्‍या असून, सकाळी सहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत हा बंद चालणार आहे. डॉ. पाटणकर यांनी दिलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे, की केंद्र सरकारने जाहीर केलेल्‍या तीन कृषी विधेयकांना शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून, त्‍याच अनुषंगाने गेले वर्षभर दिल्‍लीभोवती विविध राज्‍यांतील शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनातील शेतकऱ्यांची संख्‍या लाखोंच्‍या घरात असून, अनेक शेतकऱ्यांनी या विधेयकांना विरोध करत आपले प्राण सोडले आहेत. शेतकरी आणि जनता यांची जिद्द, चिकाटीचे दर्शन या आंदोलनाच्‍या माध्‍यमातून पहिल्‍यांदाच दिसून येत आहे. संपूर्ण शोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या चळवळीची ही नांदी ठरण्यासाठी आता या चळवळीला बळ देणे गरजेचे असल्‍याचे मतही त्‍यांनी पत्रकात व्‍यक्‍त केले आहे.

शेतकऱ्यांच्‍या आंदोलनाचा आवाज बुलंद करण्‍यासाठी सर्व कष्टकरी स्त्री-पुरुष जनतेने (ता. २७) चा बंद यशस्वी करण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहनही त्‍यांनी पत्रकात केले आहे. याच अनुषंगाने कॉम्रेड संपत देसाई, कृष्णा पाटील, मोहन अनपट, प्रशांत पन्हाळकर, मेजर सुखदेव सुभेदार बन, अंकुश शेडगे, राजन भगत, मारुती पाटील, ॲड. शरद जांभळे, दिलीप गायकवाड, ॲड. निरंजनी शेट्टी, डी. के. बोडके यांनी देखील बंदमध्‍ये सहभागी होण्‍याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Red Alert : राज्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट; २४ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार सरींचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 22 जुलै 2026

Tomato Paratha: कधी खाल्लाय का टोमॅटो पराठा? 20 मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी आज नक्की ट्राय करा

NEET Protest: NEET पेपरफुटीवर राहुल गांधींचे मोदींच्या निवासस्थानासमोर आंदोलन; राहुल-प्रियांका गांधी ताब्यात

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT