Due to heavDue to heavy rains and prolonged season, the price of onion has gone upy rains and prolonged season, the price of onion has gone up 
सातारा

कांदा आता चिरण्यापूर्वी डोळ्यात आणतोय पाणी

मुकुंद भट

ओगलेवाडी ( सातारा) : अतिवृष्टीने व हंगाम लांबल्याने कांद्याचा दर 60 ते 80 रुपये झाला आहे. आत्तापर्यंतचा विक्रमी व उच्चांकी दर आहे. सामान्यांचे खाणे असलेला कांदा त्यांना दुर्मिळ व दुरापास्त झाला आहे. घरोघरी गृहिणींना कांदा रडवत आहे. कांदा वापरताना चिरण्यापूर्वीच त्यांच्या डोळ्यात पाणी आणले जात आहे. 

वर्षभर लागणारी कांदा, लसूण चटणी उन्हाळ्यात कोरोनामुळे तयार करणे अडचणीचे होते. दिवाळीपूर्वी चटणी तयार करण्याची लगबग सुरू असताना ऐनवेळी कांदा दर वाढल्याने चटणीच्या खर्चाचा आर्थिक मेळ घालणे जिकिरीचे झाले आहे. हॉटेलमध्ये कांदा मागू नये, असे फलक आता दिसत आहेत. कांद्याऐवजी सर्रास कोबीचा वापर होऊ लागलेला आहे. कांदा, भेंडीऐवजी कोबी भजी दिली जात आहेत. मिसळमधून कांदा गायब झालेला आहे. कांदा पोहे ऐवजी बटाटा पोहे मिळत आहेत. 

बाजारात कांदा महागल्याने कोबीचा खप वाढला आहे. कोबीचा एक किलोचा दर 60 ते 80 रुपये आहे. कांदा महागल्याने भेळ व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यांच्या खपावर परिणाम झाला आहे. कांदा दर वाढल्याने उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी सामान्य ग्राहक दरवाढीने भरडला जात आहे. कांद्याचा वाढलेला भाव सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. पंधरवड्यापूर्वी कांदा भाव 15 ते 30 रुपये नंतर 50 ते 60 रुपये झाला. आता भाव दीडपटीने झाल्याने महागाईने गिऱ्हाईक हैराण झाले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT