सातारा

कोयना धरण 80 टक्के भरले; पायथा वीजगृहातून नदीपात्रात पाणी

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 30,094 क्‍युसेक झाली असून, धरणाच्या पाणीसाठयात 24 तासात तीन टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात 83.36 टीएमसी पाणीसाठा झाला असून, कोयना धरण 80 टक्के भरले आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात 59 टक्के पाऊस झाला आहे. धरणाचा पायथा वीज गृह कार्यान्वीत करण्यात आला असून, त्यासाठी धरणातून नदीपात्रात 2,111 कूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.

आमच ठरलं... या 15 गावांत एक गणपती

दरम्यान आज (शुक्रवार) दुपारी दोन वाजता दरवाजांतून पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने जाहीर केला होता. मात्र, दुपारी पावासाचा जोर काहीसा कमी झाल्याने पाणी सोडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. पायथा वीजगृहातील विसर्ग मात्र चालूच होता. पावसाचा अंदाज घेऊन धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले.

या वयातील लोकांना कोरोनाचा जास्त धोका

24 तासात पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर 112 मिलीमीटर, नवजा 122 मिलीमीटर, तर महाबळेश्वर 177 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभरात पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरीवर सरी पडत असल्या तरी त्याची तीव्रता कमी आहे. कोयनानगर 64/3054 मीलीमीटर, नवजा 45/3379 मिलीमीटर, तर महाबळेश्वर 65/3389 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण 89 टक्के भरले आहे. धरणाचा पायथा वीज गृह कार्यान्वीत करण्यात आला असून, त्यासाठी नदीपात्रात 2,111 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. 

'याच' वेळी साेडा काेयना धरणातील पाणी : गृहराज्यमंत्र्यांची सूचना

चोवीस तासात पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त होते. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक जादा असल्याने जलपातळीत लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे धरणाचे सहा वक्री दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला होता. परीचलन सुचीप्रमाणे धरणात असणारा पाणीसाठा नव्हता त्याच बरोबर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसावर धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला जाईल. 

- कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील


यंदा बाप्पाचे ऑनलाईन घ्यावे लागणार भक्तांना दर्शन ! 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,100 अंकांनी वाढला, निफ्टी 23,900 पार; सेन्सेक्स-निफ्टीत अचानक वाढ का?

शांतता कराराची घोषणा पण ट्रम्पसमोर इराणच्या ३ मोठ्या अटी, अमेरिका-इराण डीलमध्ये १४ मुद्दे महत्त्वाचे

Fifa World Cup 2026: ब्राझीलला बरोबरीचेच समाधान; मोरोक्कोसमोर पाच वेळच्या विजेत्यांचा कस, व्हिनिसियसच्या गोलने दिलासा

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर दौऱ्यात मनोज जरांगेंकडून अंबाबाईचे दर्शन

SCROLL FOR NEXT