Encroachment removed on Powai Naka satara city 
सातारा

पोवई नाक्यावरील अतिक्रमण हटवले

टपऱ्या, दुकाने हटविण्‍यात आले

सकाळ वृत्तसेवा

सातारा - येथील पोवईनाका परिसरातील अतिक्रमणे आज पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आली. या कारवाईस माजी नगरसेवक श्रीकांत आंबेकर यांनी आक्षेप घेत गोंधळ घातल्‍याने त्‍याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. तणाव असतानाही पोलिस बंदोबस्‍तात ती अतिक्रमणे काढत परिसर रिकामा करण्‍यात आला.

पोवईनाका येथे जागेवर काही टपऱ्या आणि खाद्यगाडे आहेत. यानुसार आज त्‍याठिकाणी कर्मचारी दाखल झाले. येथील टपऱ्या, तसेच दुकाने हटविण्‍यास सुरुवात केली. याची माहिती मिळाल्‍यानंतर त्‍याठिकाणी माजी नगरसेवक श्रीकांत आंबेकर हे आले. या वेळी त्‍यांच्‍यासोबत काही महिलाही होत्‍या. त्‍यांनी अतिक्रमण हटविण्‍यास विरोध करत आरडाओरडा सुरू केला. त्‍याकडे दुर्लक्ष करत अतिक्रमण हटविण्‍याचे काम सुरूच ठेवण्‍यात आले.

या वेळी या जागेबाबत कायदेशीर प्रक्रिया आणि तांत्रिक वाद सुरू असल्‍याचे श्री. आंबेकर यांनी सांगत मोहीम थांबविण्‍याची, तसेच कागदपत्रे सादर करण्‍यास वेळ मागितली. तोपर्यंत पथकाने त्‍याठिकाणच्‍या टपऱ्या व त्‍यावर टाकण्‍यात आलेले अच्‍छादन हटविले होते. या कारवाईच्‍या पार्श्‍वभूमीवर त्‍याठिकाणी शहर पोलिस ठाण्‍याचे अधिकारी, कर्मचारी बंदोबस्‍तासाठी तैनात करण्‍यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

SCROLL FOR NEXT