सातारा

मळणी यंत्रात पाय अडकला अन् गुडघ्यापासून पाय तुटून पडला; पण ह्या पठ्ठ्यानं जिद्द मात्र सोडली नाही!

विलास खबाले

विंग (जि. सातारा) : अपघातात अपंगत्व आलेच तर माणूस खचून जातो. मात्र, तब्बल आठ वर्षांपूर्वी मळणी यंत्रात पाय गमावलेल्या कुसूर (ता. कऱ्हाड) येथील जिद्दी शेतकऱ्याने अपंगत्वावर मात करताना कृत्रिम पाय बसवून शेती व शेतीपूरक व्यवसाय पुन्हा सावरला आहे. यंत्राच्या साह्याने इतरांची शेती फुलवणारे दिलीप सावंत हे तंदुरुस्त शेतकऱ्यांसाठी आदर्शवत ठरले आहेत. 

कऱ्हाड-ढेबेवाडी रस्तालगत कुसूर हे गाव आहे. गावचा शेती हाच प्रमुख व्यवसाय असून शेतीशी पूरक व्यवसायावर बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी चालतो. तेथील दिलीप सावंत यांची थोडी शेती आहे. त्याच्याशी निगडित ट्रॅक्‍टर व त्यावरील यंत्राच्या साह्याने स्वतःची व इतरांची शेती ते करतात. व्यवसायातून स्वतःचे कुटुंब चालवताना 2012 मध्ये त्यांचा अपघात झाला. स्वतःच्या शेतात गव्हाची मळणी सुरू असताना मळणी यंत्रात त्यांचा पाय अडकला. काही कळायच्या आत गुडघ्यापासून खाली पाय तुटून तो बाजूला पडला. या प्रसंगानंतरही ते घाबरले नाहीत. कुटुंबाच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात नेऊन उपचार केले. 

बेताच्या परिस्थितीमुळे गावकऱ्यांनीही त्यांना आर्थिक मदत केली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही त्यांना मदत केली. कृत्रिम पाय बसवून दिला. कुबड्या दिल्या. या अपंगत्वावर मात करताना व्यवसायातील जिद्द त्यांनी पुन्हा पकडली. स्वतःच्या शेतीपूरक व्यवसायात ते पुन्हा उतरले. आज ते खंबीरपणे ट्रॅक्‍टर व यंत्रे चालवतात. ट्रॅक्‍टरवरील यंत्राच्या साह्याने इतरांची शेती करतात. या कामी पत्नी सुनिताची साथ त्यांना नेहमीच बळ देते. आज ते पन्नासीत असले तरी तरुणांना लाजवेल असेच ते पूर्वीप्रमाणे कार्यरत आहेत. धडधाकट शेतकऱ्यांपुढे ते आदर्शवत ठरले आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Mango Crisis : कोकणचा कणा असलेला आंबा संकटात; ९० टक्के मोहोर करपल्याने बागायतदार हवालदिल

T20 World Cup नंतर टीम इंडिया WTC ट्रॉफी जिंकणार का? जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सद्यस्थिती काय?

LPG Cylinder: महत्वाची बातमी! मुंबईत एलपीजी गॅसचा तुटवडा; हॉटेल-रेस्टॉरंट्स अडचणीत, गॅस रिफिलसाठी वाढली प्रतीक्षा

भारताने ज्या क्षणी T20 World Cup जिंकला, त्या क्षणी कशी होती धोनी-रोहितची रिअॅक्शन? समोर आला खास Video

Pune Traffic: पुण्यातील वाहतुकीसंबंधी मोठा निर्णय! पावसाळ्यापूर्वी तीन पुलांचं काम होणार पूर्ण; 'या' रस्त्यांचंही झालं नियोजन

SCROLL FOR NEXT