सातारा

साताऱ्यातील दरोडाप्रकरणी पुण्याचे चौघे ताब्यात

उमेश बांबरे

सातारा : कोरोनाच्या सर्व्हेसाठी आल्याचे सांगून जबरदस्तीने घरात घुसून पिस्टलचा धाक दाखवत दरोडा टाकल्याप्रकरणी महिलेसह चौघांना सातारा शहर पोलिसांनी रात्री उशीरा अटक केली. महेंद्र रामदास मारणे, रुपाली दत्तात्रय टेमगिरे, (रा. हडपसर पुणे), सोमनाथ अंकुश सातव (रा. मांजरी बुद्रुक, पुणे) आणि युवराज यशवंत शिंदे (रा. हडपसर) अशी संबंधित संशयितांची नावे आहेत. तर गोविंद रामदास मारणे (रा. हडपसर) हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

यासंदर्भात सातारा शहर पोलिसांत श्रीकांत विठ्ठल बिल्लंमपल्ली यांनी फिर्याद दिली आहे. बिल्लंमपल्ली हे निवृत्त आरटीओ कर्मचारी असून ते साताऱ्यातील रविवार पेठेत यशोदीप अपॉर्टमेंटमध्ये राहतात. शुक्रवार (ता. 28) रोजी त्यांच्या घराची बेल वाजवत एक महिला व सोबत एक पुरूष यांनी आम्ही वैद्यकीय पथकातील असून कोरोनाची माहिती घेण्यास आल्याचा बनाव करत घरात प्रवेश केला. यानंतर दरवाजा उघडाच असल्याने आणखी दोघांनी घरात प्रवेश करून बिल्लंमपल्ली यांना घरातील कोचवर पाडून तोंड दाबले.

तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची 80 हजारांची चेन जबरदस्तीने काढून घेतली. यावेळी त्यांनी आरडाओरडा केला तर त्यांच्या पत्नीने प्रतिकार केला. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी महिलेसह तिघांना पकडून चोप दिला. पुणे पासिंगच्या कारमधून हे संशयित आले होते. त्यापैकी महिलेसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक एन. एम.कदम अधिक तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

SCROLL FOR NEXT