सातारा

खाशाबा जाधवांना पद्मविभूषण पुरस्कार द्या : खासदार श्रीनिवास पाटील

सचिन शिंदे

कऱ्हाड : भारताला ऑलिंपिकमध्ये पहिले वैयक्तिक कास्यपदक मिळवून देणारे जिल्ह्याचे भूमिपुत्र (पै.) खाशाबा जाधव यांना खास बाब म्हणून मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. राज्य सरकारनेही तशी शिफारस करावी, अशी मागणी पद्म पुरस्कार शिफारस समितीचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याकडेही खासदार पाटील यांनी नुकतीच केली आहे. 

खासदार पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, सातारा लोकसभा मतदारसंघाच्या कऱ्हाड तालुक्‍यातील गोळेश्वर येथील (कै.) खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये फिनलंड देशाच्या हेलसिंकी शहरामध्ये आयोजित केलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रीस्टाइल बॅन्टमवेट कुस्तीमध्ये कास्यपदक मिळविले. त्यांच्या या कामगिरीने देशवासीयांची मने भरून गेली होती. केंद्र सरकारने 1952 मध्ये त्यांच्या नावाचे पोस्टाचे तिकिटही छापले होते.

2000 मध्ये क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार अर्जुन अॅवॉर्ड देवूनही त्यांचा गौरव केला होता. खाशाबा जाधव यांनी त्याकाळी प्रशिक्षण, सोयी-सुविधांचा अभाव असूनही प्रतिकूल परिस्थितीत मात करत कामगिरी केली होती. त्यामुळे देशाचे नाव उज्ज्वल झाले होते. त्यांनी कुस्तीमध्ये मिळविलेले कास्यपदक 1952 पासून पुढील 44 वर्षे भारतासाठी मिळालेले एकमेव व्यक्तिगत पदक होते. 

राष्ट्राला दिलेली सेवा आणि कुस्ती क्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. मागील अनेक वर्षांपासून त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशी मागणी नागरिक व क्रीडाप्रेमींमधून होत आहे. जीवनकाळातच पद्म पुरस्कार दिला जातो. परंतु, विशेष बाब म्हणून पुरस्कार दिला जावा. त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने मरणोत्तर सन्मान करण्यात यावा, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. त्याबाबत राज्य सरकारनेही शिफारस करावी, अशी विनंती पद्म पुरस्कार शिफारस समितीचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनाही खासदार पाटील यांनी केली आहे.  

संपादक : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT