सातारा

क्रीडा संकूलाचे कुलूप ताेडले; सातारा पाेलिसांची घुसखाेरी?

सिद्धार्थ लाटकर

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूल निवडणूक विभागाने ताब्यात घेतले आहे. या संकूलातील सिथेंटिक बास्केटबाॅल मैदानाच्या दरवाज्यास आज (गुरुवारी) कुलुप हाेते. निवडणुकीच्या कामासाठी आलेल्या पाेलिसांनी मैदानात प्रवेश केला. या कृत्यामुळे कुलुप ताेडणा-याचा शाेध घेऊन संबंधितावर कारवाई व्हावी अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींमधून व्यक्त हाेऊ लागली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामकाजासाठी निवडणूक विभागाच्या सूचनेनूसार छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलातील सर्व क्रीडा सुविधा उद्यापासून (ता. 14) ते 18 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांना काढला. त्यानूसार बुधवारी (ता.13) दुपारनंतर तसा फलक क्रीडा संकूलाच्या मुख्य प्रवेशदारावर लावला.

आधी बायकोला प्रेमानं शेवटचं Hug, मग दिलं लोकलमधून ढकलून
 
उद्या (ता. 15) ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी आज (गुरुवार) ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व प्रक्रिया (मशिन पाठविणे, आदी) राबविण्यात येत आहे. मतदान झाल्यावर सर्व व्हीव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन संकुलातील गोडाऊनमध्ये ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर येथेच 18 जानेवारीला निकालाची प्रक्रिया सकाळपासून सुरू होणार केली जाणार आहे. 

भाविकांनाे! श्री यमाईदेवीच्या मंदिराचे दरवाजे तात्पुरते राहणार बंद

आज (गुरुवार) सकाळच्या प्रहरी नित्यनेमाने व्यायामासाठी येणा-या क्रीडापटूंना क्रीडा संकूल बंदची काेणतीच माहिती नव्हती. त्यामुळे माेठ्या संख्येने क्रीडापटू क्रीडा संकूलाच्या बाहेर जमले हाेते. क्रीडा संकूल बंदचा आदेश दुपारी आदेश लावल्याने आम्हांला कसे समजणार अशी त्यांचे म्हणणे हाेते. याच काळात काही अनाेळखी व्यक्तींनी निवडणुकीच्या कामासाठी आलेल्या पाेलिसांना क्रीडा संकूलातील सिथेंटिक मैदानावरील प्रवेशदाराचे कुलुप ताेडून आत प्रवेश दिला. याची माहिती क्रीडाप्रेमींनी बाहेर समजल्यावर या प्रकाराचा निषेध करण्यात आला. 

श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूल हे केवळ खेळासाठीच वापरले जावे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून क्रीडाप्रेमी करीत आहेत. त्याकडे जिल्हा क्रीडा संकूल समिती दुर्लक्ष करीत आहे. दरम्यान आजच्या (गुरुवार) कुलूप ताेडण्याच्या प्रकाराबाबत जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांच्याशी संपर्क साधला असता मी प्रवासात आहे. आपण सांगितलेला प्रकार नेमका काेणी केला याचा शाेध घेतला जाईल. त्यानंतर तुम्हांला माहिती देऊ असे नमूद केले.

कल्याण - मुंबई मटका जाेमात; पोलिसांनी छडा लावताच मुख्याधिका-यांचे कारवाईचे संकेत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT