Satara Latest Marathi News Satara Politics News 
सातारा

Gram Panchayat Results : राष्ट्रवादी-भाजप आघाडीने सेनेला केले चारीमुंड्या चित!

यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (जि. सातारा) : जिल्ह्यात ग्रामपंचायतींचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली असून काही ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना देखील पराभवाची चव चाखायला मिळाली असून नवख्या उमेदवारांना यानिमित्त संधी मिळाली आहे. पाटण तालुक्यातही धक्कादायक निकाल समोर आला असून यात गृहराज्यमंत्र्यांना राष्ट्रवादीने दणका दिला आहे. 

पाटण तालुक्यात सर्वात मोठ्या असलेल्या तारळे ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून गृहराज्यमंत्र्यांना एकाप्रकारे धक्का बसला आहे. ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी-भाजप आघाडीने 10 जागा राखत आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे, तर गृहराज्यमंत्र्यांच्या शिवसेनाला केवळ 7 जागांवरच समाधान मानावे लागले आहे.

तालुक्यात चर्चेचा विषय ठरलेल्या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी-भाजप आघाडीने सेनाला धक्का दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपशी केलेली युती कितपत सेनेला रुचते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या निकालाने तालुक्यातील राजकीय समीकरणंही बदलण्याची चिन्हे आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaidyanath Karkhana: गोपीनाथ गडाचा परिसर असलेल्या जमिनीचीही विक्री; 'वैद्यनाथ'कडे असलेली बाकी कोण देणार? पंकजा मुंडेंचं अजूनही मौनच

चिमुकल्यांसाठी धमाल घडवणारं नाटक रंगभूमीवर; 'माकडचाळे' बालनाट्याचा दिवाळीत होणार शुभारंभ; माकडाच्या भूमिकेत कोण दिसणार?

Pregnancy Nutrition Tips: ए. जी. ई म्हणजे नेमकं काय? गरोदरपणावर त्याचा काय परिणाम होतो? वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर

Satana Election News : 'मतदार यादीतील दुबार नावे हा लोकशाहीचा खून'; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Pune Police : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून १८ सराईत गुन्हेगार तडीपार

SCROLL FOR NEXT