Satara Latest Marathi News Satara Politics News 
सातारा

कोपर्डे हवेलीत राष्ट्रवादी काठावर पास; अवघ्या एक मताने हुकली कॉंग्रेसची संधी

जयंत पाटील

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध कॉंग्रेस अशी पारंपरिक लढत झाली. त्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीने सत्ता कायम राखली असली, तरी काठावरील सत्ता आहे. कॉंग्रेसच्या वॉर्ड क्रमांक तीनमधील अनिता यादव यांचा केवळ एक मताने पराभव झाला. त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादीच्या स्मिता लोहार विजय झाल्या. यादव यांचा केवळ एका मताने झालेल्या पराभवामुळे कॉंग्रेसच्या सत्तांतराची संधी हुकली. सत्ताधारी राष्ट्रवादी आठ, तर कॉंग्रेसला सात जागा मिळाल्या. 

राष्ट्रवादीचे नेतृत्व सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण व माजी संचालक बळवंतराव चव्हाण, तर कॉंग्रेसचे नेतृत्व बाजार समितीचे माजी सभापती हिंदुराव चव्हाण आणि कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण यांनी केले. दोन्ही गटांकडून प्रभावी प्रचार यंत्रणा होती. अटीतटीच्या लढतीत कॉंग्रेसचा एक उमेदवार एका मताने पराभूत झाला अन्‌ सत्तेचे पारडे राष्ट्रवादीच्या दिशेने फिरले. त्यामुळे कॉंग्रेसची सत्तांतराची संधी हुकली, तर राष्ट्रवादीची सत्ता अबाधित राहिली. कॉंग्रेसच्या एका उमेदवारचा एका मताने पराभव झालेला त्यांच्या जिव्हारी लागला आहे. परिणामी हातातोंडाशी आलेली सत्ता गमवण्याची कॉंग्रेसवर वेळ आली. काठावर मिळालेले यश राष्ट्रवादीला आत्मचिंतन करायला लावणारे आहे.

विजयी उमेदवारांना मिळालेली मते 

राष्ट्रवादी पुरस्कृत विजयी उमेदवार : दत्तात्रय चव्हाण (522), शकुंतला चव्हाण (540), शुभांगी चव्हाण (555) नेताजी चव्हाण (417), स्मिता लोहार (414), सीमा साळवे (522), सुनील सरगडे (452), उज्ज्वला होवाळ (493) 
कॉंग्रेस पुरस्कृत विजयी उमेदवार : अंजनी चव्हाण (422), अमित पाटील (513), वंदना लोहार (471), शोभा चव्हाण (468), रघुनाथ खरात (539) व नानासाहेब चव्हाण (597), दत्तात्रय काशीद (463). 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result पेपरफुटीनंतर गुणांचा महाघोटाळा, अन्सर की अन् स्कोअरकार्डवर वेगवेगळे गुण; बीडच्या 2 विद्यार्थ्यांचा आक्षेप

FDA Action: तुकाराम मुंढेंची मुंबईत धाड! १० लाखांचे साबण जप्त, अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुंबईत CJP चे आंदोलन, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Corona Virus: कोरोना परत येतोय? महाराष्ट्रात ४८ जणांना लागण; धक्कादायक माहिती समोर

Tukaram Mundhe यांच्या धाडीनंतर अकोल्यातील गुटखा कारवाईत मोठा ट्विस्ट, काय घडलं?

SCROLL FOR NEXT