सातारा

वेणूताई चव्हाण रुग्णालयातील सर्व 45 बेड तातडीने सुरु करा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) :  वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील सर्व 45 बेड तातडीने सुरु करावेत आणि रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर लोकांना अंगावर आजार न काढता तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज (ता. ११) केले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात पालकमंत्री श्री. पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात तालुक्‍यातील आरोग्य अधिकारी, डॉक्‍टर यांच्याशी चर्चा करून सद्य परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोनासंदर्भातील अडीअडचणी पालकमंत्री पाटील यांनी जाऊन घेतल्या. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्यासह डॉक्‍टर, अधिकारी उपस्थित होते. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात नव्याने 45 बेड तयार करण्यात आले आहेत. ते तातडीने सर्व बेड कार्यान्वित करावे. कोरोनाबाधितांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अनेकजण अंगावर आजार काढत आहेत. त्यांना जास्त झाल्यावरच ते तपासणीसाठी येत आहेत. तसे न करता सर्वांनी काही लक्षणे असल्यास तातडीने तपासणी करुन उपचार घेतली पाहिजे. त्याच्या सर्व्हेसाठी येणाऱ्या आशांनाही माहिती द्यावी. 

त्याचबरोबर कऱ्हाड, मलकापूर आणि ग्रामीण भागातील लोकांची तपासणी वाढवावी. होम आयसोलेशन आणि संपर्कातील व्यक्ती शोधण्यावर भर देण्यात यावा. त्यामुळे बाधितांची साखळी रोखता येईल. आरोग्य यंत्रणेने चांगले काम करुन लोकांना दिलासा द्यावा, असेही त्यांनी शेवटी सांगितले. दरम्यान, प्रांताधिकारी दिघे यांनी तालुक्‍यातील उपाययोजनासंदर्भात माहिती दिली. आरोग्य अधिकाऱ्यांनाही आत्तापर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: दोरी घासून गळा कापला! ठेकेदाराचा निष्काळजीपणा तरुणाच्या जिवावर; पुण्यातली घटना

Shreyas Talpade FIR : राजपाल यादवनंतर आता अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत ; ‘या’ प्रकरणी दाखल झाला ‘FIR’!

Uruli Kanchan Accident : उरुळी कांचन येथे पोलीस स्टेशन समोर कंटेनर व पिकअपचा अपघात एक ठार, तीन जखमी

Crime: प्रेम प्रकरण की आणखी काही...? आत्या आणि भाचीनं एकाच वेळी जीवन संपवलं; पोलिसांनी सांगितली धक्कादायक माहिती

Rahul Gandhi: ''राहुल गांधींना हक्कभंगाची नोटीस देणार'', संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT