Dhebewadi valley esakal
सातारा

ढेबेवाडी खोऱ्याला वादळी पावसाचा जोरदार तडाखा; घरे-दुकानांसह शाळांचे नुकसान, झाडे मोडली, विजेचे खांब वाकले

ढेबेवाडी परिसराला काल दुपारी वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

सकाळ डिजिटल टीम

ढेबेवाडी- कऱ्हाड मार्गावर येथील पुलापासून जवळच तसेच धामणी, मान्याचीवाडी, गलमेवाडी (कुंभारगाव), साबळेवाडी या परिसरात अनेक झाडे मोडून रस्त्यावर पडली होती.

ढेबेवाडी : परिसराला काल दुपारी वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शाळेसह, दुकानगाळे आणि घरांवरील छप्परे वादळात उडून गेली. रस्त्यांवर, तसेच वाहनावर झाडे मोडून पडली. विजेचे खांब कोसळल्याने विभागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. गेल्या तीन आठवड्यांत विभागाला बसलेला वादळी पावसाचा हा दुसरा मोठा तडाखा असून, त्यामध्ये मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. साधारणपणे दीड तास झालेल्या पावसाने अनेक ठिकाणचे ओढे नाले दुथडी भरून वाहिले.

परिसरात आज दुपारी साडेबारानंतर वादळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने लोकांची मोठी तारांबळ उडाली. वादळात मानेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीवरील पत्रे उडाले. काही पत्रे दूरवर उडून झाडावर अडकले होते. शाळेला सध्या उन्हाळी सुटी असल्याने सुदैवाने दुर्घटना टळली. मानेगाव - कुंभारगाव रस्त्यावर विजेच्या खांबासह झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प होती.

ढेबेवाडी- कऱ्हाड मार्गावर येथील पुलापासून जवळच तसेच धामणी, मान्याचीवाडी, गलमेवाडी (कुंभारगाव), साबळेवाडी या परिसरात अनेक झाडे मोडून रस्त्यावर पडली होती. साबळेवाडी येथे घराजवळ लावलेल्या दत्तात्रय भीमराव साबळे यांच्या कारवर झाड पडल्याने कारचे नुकसान झाले. मान्याचीवाडी येथील बबनराव माने, गलमेवाडीत सखाराम चोरगे, मस्करवाडी (धामणी) येथील शत्रुघ्न मस्कर, तसेच पाटील आवाडजवळही एका घरांचे वादळात नुकसान झाले.

तळमावले येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या तीन दुकान गाळ्यांवरील छप्पर उडाल्याने गाळ्यासह साहित्याचेही नुकसान झाले. वादळी पावसात विजेचे खांब मोडून वाहिन्या तुटल्याने अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळाने आंब्याचे अतोनात नुकसान झाले आहे.गलमेवाडी, मान्याचीवाडी येथील ओढे पावसाने भरून वाहत होते.

...तीन आठवड्यांत दुसऱ्यांदा तडाखा

गेल्या महिन्यात २४ तारखेला विभागातील काळगाव, धामणी व परिसरातील वाड्यावस्त्यांना वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला होता. त्या वेळी सुमारे ४५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. त्या वेळी पंचनामे होऊनही अद्याप शासकीय मदत मिळाली नसल्याचे नुकसानग्रस्तांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT