सातारा

ओगलेवाडी पोस्टाचे व्यवहार 'नेट' अभावी ठप्प

मुकुंद भट

ओगलेवाडी (जि. सातारा) : "बीएसएनएल'च्या विस्कळित कारभाराने येथील पोस्टाची इंटरनेटची सेवा बंद असल्याने पोस्टाचे आर्थिक व्यवहार व इतर सुविधा ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे परिसरातील ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. कोरोनाच्या भयंकर संकटाने लोक त्रस्त असताना पोस्टातील पैसे मिळत नसल्याने लोकांमध्ये असंतोष आहे. 

कोरोनामुळे लोकांचे व्यवसाय व रोजगार बंद आहेत, त्याचा दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला आहे. अडचणीच्या काळामध्ये पोस्टातील पैसे मिळत नसल्याने अडचणीत आणखीनच भर पडली आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या कामात पैसे मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कुचंबना झाली आहे. नोकरदारांचे पगार अद्याप झाले नसल्याने पैशाअभावी अडचणीत वाढ झालेली आहे. लोकांनी सातारा व कऱ्हाड "बीएसएनएल'च्या कार्यालयाशी येथील पोस्टामधील नादुरुस्त इंटरनेट सेवेसंबंधी संपर्क साधला असता तेथील काही दूरध्वनी बंद आहेत. काही सुरू असले तरी उचलले जात नसल्याने खात्याची बेपर्वाई व निष्काळजीपणा दिसून येत आहे. दूरसंचार निगमने त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी लोकांची मागणी आहे. दूरध्वनी ग्राहक चौकशीचे क्रमांक जाहीर करावेत, अशी मागणीही होत आहे. 

अनेक ग्राहकांनी दूरध्वनी बंद करून त्यांची थकीत अनामत रक्कम एक वर्ष होऊनही अद्याप मिळाली नसल्याने ग्राहकांच्या तक्रारी आहेत. "कनेक्‍टिंग इंडिया' या ब्रीद वाक्‍याचा खात्याला विसर पडला आहे, अशी ग्राहकांची प्रतिक्रिया आहे. येथे रेल्वे पुलाजवळ झालेल्या खोदाईमुळे केबल तुटल्याने इंटरनेट सेवा बंद असल्याचे समजते. तेथील काम तातडीने पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, अन्यथा लोकांच्या असंतोषास तोंड द्यावे लागेल. परिसरातील इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असते. येथील पोस्टामध्ये परिसरातील आठ ते दहा गावांतील लोकांचे आर्थिक व्यवहार होत असतात. सेव्हिंग बॅंक व्यवहार, रिकरिंग डिपॉझिट, गुंतवणूक व्यवहार, रजिस्टर पार्सल आधी सुविधा यामुळे ठप्प झाल्या आहेत.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रात्री घरात घुसून महिलेचे कपडे उचलणं बलात्काराचा प्रयत्न नाही, हायकोर्टाचा आरोपीला दिलासा

IND vs WI : श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून OUT! नेमकं काय कारण अन् कोण असतील भारताचे १५ शिलेदार?

Safe Investment: 2,000 रुपायांची छोटी बचत बनवेल 1.42 लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसची ही योजना पाहिली का?

Shani Sade Sati 2026 : शनीची साडेसाती बिघडवणार गेम! 2026 मध्ये 'या' 3 राशींवर राहणार शनीची नजर; वाचा तुमचा टप्पा कोणता?

Marathi News Live Updates : मराठा आरक्षणावर फडणवीसांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT