Prithviraj Chavan esakal
सातारा

तांबवेतील नवीन पुलासाठी प्रयत्नशील : आमदार पृथ्वीराज चव्हाण

आमदार चव्हाणांनी तांबवेतील पुलाची केली पाहणी

अनिल बाबर

तांबवे (सातारा) : पूरग्रस्त (Karad Flood) तांबवे गावातील नव्याने बांधलेल्या पुलावरूनही पाणी गेले म्हणजे आश्चर्यच आहे. गावासह परिसराच्या दळणवळणासाठी नवीन पुलाचा प्रस्ताव द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) यांनी केले. गाव मोठे असल्याने गावात पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करा. त्यासाठी जागा बघून प्रस्ताव द्या, अशीही सूचना त्यांनी ग्रामस्थांना केल्या.

पूरग्रस्त (Karad Flood) तांबवे गावातील नव्याने बांधलेल्या पुलावरूनही पाणी गेले म्हणजे आश्चर्यच आहे.

पूरग्रस्त तांबवे गावास आमदार चव्हाण यांनी भेट देऊन पूरपरिस्थितीनंतरच्या अवस्थेची पाहणी केली. तत्पूर्वी त्यांनी ज्येष्ठ नेते (कै.) पी. डी. पाटील, (कै.) डॉ. डी. के. पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी तांबवे ग्रामपंचायतीस भेट दिली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, तांबवे गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सह्याद्री कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील, युवा नेते सतीश पाटील, उद्योजक अशोकराव पाटील, तांबवे ग्राम सोसायटीचे सचिव सुनील पाटील, काकासाहेब पाटील, लेखा परीक्षक विजय पाटील, आबासाहेब पाटील, प्रकाश पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार चव्हाण यांनी तांबवे पुलाची पुरामुळे झालेली दुरवस्थेची पाहणी केली.

त्या वेळी झालेल्या चर्चेत सतीश पाटील यांनी पहिला पूल मोठा होता. मात्र, निधीसाठी पुलाची उंची कमी करण्यात आली. त्या नवीन पुलावरून अनेकदा पाणी गेल्याचे सांगितले. त्यावर आमदार चव्हाण यांनी आश्चर्य व्यक्त करून नवीन पुलाचा प्रस्ताव द्या, अशा सूचना केल्या. ग्रामपंचायतीतील भेटीदरम्यान आमदार चव्हाण यांनी गावासाठी पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य केंद्र घ्या. गाव मोठे असल्याने परिसराला त्याचा फायदा होईल, असे सांगितले. त्यावर गावाला जागा नसल्याने अडचण असल्याचे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांनी सांगितले. त्यावर आमदार चव्हाण यांनी जागेसाठी प्रस्ताव द्या, अशा सूचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराजवळ 'ही' झाडे लावणे मानले जाते शुभ; जाणून घ्या घरासाठी फायदेशीर असणारी रोपे!

Pune News : झाडणकाम वाढले, रस्ते स्वच्छ, उकिरडे झाले कमी

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरण, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Rapido Crime : बेकायदा प्रवासी वाहतूकप्रकरणी ‘रॅपिडो’वर गुन्हा दाखल

Shirur Crime : न्हावरेत कार चालकाला धमकी; मारहाण करून स्विफ्टच्या काचा फोडल्या.....

SCROLL FOR NEXT