Vande Bharat Express sakal
सातारा

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसला कराड, सांगलीला थांबा द्या; खासदार श्रीनिवास पाटीलांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

मुंबई ते कोल्हापूर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वंदे भारत एक्सप्रेस 17 डिसेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती मिळत आहे.

हेमंत पवार

कराड - मुंबई ते कोल्हापूर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वंदे भारत एक्सप्रेस 17 डिसेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती मिळत आहे. या रेल्वेला कराड आणि सांगली या दोन महत्वाच्या रेल्वेस्थानकांवर थांबा मिळावा, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.

मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, अशी मागणी यापूर्वीपासून होत होती. ही रेल्वे येत्या 17 डिसेंबरला सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. या रेल्वेमार्गावर कराड हे पुणे विभागात रेल्वेला दुसऱया क्रमांकाचे उत्पन्न मिळवून देणारे रेल्वेस्थानक आहे.

त्यामुळे या रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळावा, यासाठी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य गोपाल तिवारी हे गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा करत आहेत. ही रेल्वे सुरू होणार असल्याने त्यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे मागणी केली होती.

खासदार श्रीनिवास पाटील यांनी कराड परिसरातील रेल्वे प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना 12 डिसेंबरला पत्र लिहले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून 17 डिसेंबर 2023 रोजी मुंबई-कोल्हापूर या वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन होणार असल्याचे वर्तमान पत्रांमधून आलेल्या बातम्यांवरून कळत आहे. या गाडीला सांगली आणि कराड स्थानकांवर थांबा देण्यात आला नाही.

कोल्हापूरनंतर कराड आणि सांगली ही दोन महत्वाची रेल्वे स्थानके आहेत. मुंबईला जाण्यासाठी सर्वाधिक लोक कराड आणि सांगली या स्थानकांवरून बुकिंग करतात. पर्यायाने या स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात यावा, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटना करीत आहे. मी यापूर्वीच आपणास पत्र लिहून तशी मागणी केली आहे. याची दखल घेऊन या गाडीला सांगली आणि कराड या दोन्ही ठिकाणी थांबा देण्याबाबत सूचना रेल्वेच्या संबंधित अधिकाऱयांना द्याव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT