सातारा

बाळूपाटलाचीवाडीतील युवकाच्या खूनप्रकरणी 11 जणांना सात दिवसांची काेठडी

रमेश धायगुडे

लोणंद (जि. सातारा) : बाळूपाटलाचीवाडी (ता. खंडाळा) येथील युवक सूरज बापूराव धायगुडे याच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी येथील 11 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना नुकतीच अटक केली. दरम्यान, खंडाळा येथील न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
 
संशयितांपैकी एकाच्या पत्नीस मेसेज का करतो, या कारणावरून चिडून जावून येथील मंगेश उत्तम क्षीरसागर (वय 39), राजेश उत्तम क्षीरसागर (वय 36), योगेश बाळासाहेब कांबळे (वय 34) (तिघेही रा. फुलेनगर, लोणंद), रोहित रवींद्र धनवडे (वय 30) रा. लक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे, लोणंद, सूरज राजेंद्र डोंबाळे (वय 25) मैत्री पार्क निंबाळकर हॉस्पिटलजवळ, लोणंद, राकेश भारत माने (वय 28) रा. शास्त्री चौक, लोणंद, प्रथमेश प्रकाश भोसले (वय 20) रा. गोटमाळ, लोणंद, सुरेश रामा पवार (वय 40) रा. गोटमाळ, लोणंद, धीरज प्रकाश जायमाळी (वय 25) रा. सावित्रीनगर गोटेमाळ, लोणंद, अक्षय सतीश क्षीरसागर (वय 26) रा. लोणंद व गणेश अशोक भालेराव (वय 28) रा. लोणंद यांनी बाळूपाटलाचीवाडी (ता.खंडाळा) येथील सूरज बापूराव धायगुडे (वय 23) यास संगनमताने समाधान ढाब्यासमोर लाकडी दांडक्‍याने मारहाण करून लोणंद बस स्थानकासमोर आणून टाकले. 

पहाटे सूरज यास नातेवाईकांनी उपचारासाठी पुणे येथे नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सूरज धायगुडे याचे चुलते राघू धायगुडे यांनी याबाबत लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवल्यावर लोणंद पोलिसांनी या 11 जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. दरम्यान, या सर्वांना खंडाळा न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

पदाधिकारी, नगरसेवकांचे प्रभाग झाले आरक्षित; महिलांसाठी नऊ जागा राखीव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भोंदू खरातच्या बँक खात्यांची चौकशी, २ वर्षात तब्बल २१ कोटींची उलाढाल; शिर्डीत कोट्यवधींच्या जमिनीची खरेदी, धक्कादायक खुलासे

Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गाची रेषा बदलली?, फ्रान्सच्या कंपनीचे डिझाईन; पुन्हा गोंधळाची स्थिती

Latest Marathi News Live Update : पुणेकरांनो काळजी नसावी! आज पाणी पुरवठा बंद राहणार नाही

Pune HeatWave: पुणेकरांना उष्म्याच्या झळा! महापालिका रुग्णालयांत ७७० जणांवर उपचार, एप्रिलमध्ये तापमान ४० अंशांच्या अंशांपलीकडे..

Parliament Special: संसदेचं अधिवेशन वादळी ठरणार! मतांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान, केंद्र सरकार ३६० खासदारांचा पाठिंबा कसा मिळवणार?

SCROLL FOR NEXT