सातारा

माणुसकी अजून आहे जिवंत! गाडीचालकाचा प्रामाणिकपणा, सोन्याचे ब्रेसलेट केले परत

Balkrishna Madhale

सातारा : सध्या धावपळीच्या युगात प्रामाणिकपणा दुर्मिळ होताना दिसत असून माणुसकीही हरवत चालली आहे. माणसामाणसांत दुरावा निर्माण होत आहे. आपली एखादी महागडी वस्तू अथवा महत्वाची कागदपत्रे हरवली की, ती परत मिळेल की नाही याची शाश्वती कोणालाच उरली नाही. सर्वच जण आपापल्या कामांत व्यस्त आहेत. मात्र, या जगात अशीही माणसं आपणास भेटतील, जी प्रामाणिकपणे माणुसकी जपताना दिसत आहेत. या अशा माणसांमुळे माणुसकी कुठेतरी शिल्लक असल्याची जाणीवही होत आहे. 

भोळी (ता. खंडाळा) येथील श्रीधर पानसे यांना प्रामाणिकपणाची प्रचिती नुकतीच किसनवीर कारखान्यावर आली. दिपावळीच्या पार्श्वभूमीवर काही कामानिमित्त पानसे हे कारखान्याच्या कार्यालयात गेले होते. तिथे पानसे यांच्या हातामधील सव्वा तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट परिसरात कुठेतरी हरवले. त्यांनी कारखान्यासह इतरत्र त्या सोन्याच्या ब्रेसलेटची शोधाशोध केली. पण, मिळून आले नाही. त्यांच्या सहकार्याने देखील फोनाफोनी करुन ब्रेसलेटची शोधाशोध घेतली. मात्र, त्यांच्याही पदरी निराशाच आली.

शोधाशोध सुरु असतानाच कारखान्याचे वाहनचालक सत्यवान पांडुरंग साळुंखे (अंबवडे, ता. कोरेगाव) यांना ते सोन्याचे महागड्या किमतीचे ब्रेसलेट सापडले. त्यांनी मनात कोणत्याही प्रकारची अभिलाषा न बाळगता तत्काळ त्यांनी संचालक मंडळाच्या उपस्थितीत श्रीधर पानसे यांच्याकडे ते ब्रेसलेट सुपुर्द केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे संचालक मंडळासह पानसे कुटुंबीयाने तोंडभरुन कौतुक केले. जगात असाच प्रामाणिकपणा शिल्लक असेल, तर माणुसकी टिकायला वेळ लागणार नाही, अशी प्रशंसा श्रीधर पानसे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Strawberry Cultivation : आंबेगाव, खेड, जुन्नर व मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४.९६ कोटी रुपये निधी मंजूर; विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

SCROLL FOR NEXT