सातारा

सातारा : कुळ कायद्यातील अवैध विक्री झालेल्या जमिनी होणार सरकारजमा

सिद्धार्थ लाटकर

सातारा : कुळ कायद्याच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीवर बंदी असतानाही अवैधरित्या कुळ कायद्याच्या जमिनीचे व्यवहार करून जमिनी विकल्याचे सातारा तालुक्‍यात प्रकार घडले आहेत. तहसीलदार कार्यालयाने केलेल्या पाहणीमध्ये अशी 56 प्रकरणे आढळून आली असून, पैकी दोन प्रकरणांमध्ये दंड भरून घेण्यात आला आहे. 

दहा प्रकरणांत दंड भरण्याबाबत अंतिम स्मरणपत्र देण्यात आले आहे. दंड न भरल्यास संबंधितांच्या जमिनी सरकारजमा करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. एकूण शिल्लक 44 प्रकरणांत सुनावणी सुरू असल्याची माहिती तहसीलदार आशा होळकर यांनी दिली.
 
कुळ कायद्याच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीवर सरकारने बंदी घातलेली आहे. मात्र, तरीही जमीन खरेदी-विक्री व्यवहार होत असल्याचे सातारा तालुक्‍यात निदर्शनास आले आहे. मात्र, असे व्यवहार झाले असतील तर सरकारला बाजारभावाच्या 50 टक्के रक्कम दंड म्हणून भरावयाची असते. त्यानंतर जमिनीबाबत झालेला खरेदी-विक्री व्यवहार नियमित होतो. मात्र, अनेक वर्षांपासून कुळ कायद्याच्या जमिनीची खरेदी-विक्री व्यवहार झाले आहेत. अनेकांनी त्याचा सरकारी दंड भरलेला नाही. तालुक्‍यात आत्तापर्यंत असे 56 व्यवहार समोर आले असून दाेन जणांनी तीन लाख 43 हजार 150 इतकी दंडाची रक्कम भरलेली आहे. उर्वरित अनेकांनी अजूनही दंड भरलेला नाही. त्यामुळे त्यांच्या जमिनी सरकारजमा करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचेही श्रीमती होळकर यांनी सांगितले.

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधवांचा अपमान महाराष्ट्र अजून किती सहन करणार?

सरपंच आरक्षणावरून गावकारभारी अस्वस्थ; आरक्षित सीट नसल्यास होणार विरोधी गटाचा सरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katol Explosion News : काटोलमध्ये बारूद कंपनीत मोठा स्फोट; १२ कामगारांचा मृत्यू, अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Maharashtra Weather Update : मार्चमध्ये उष्णतेच्या लाटा; उन्हाचा चटका अधिक जाणवणार; यंदा उन्हाळ्यात कसं असेल तापमान?

16 व्या वर्षी लग्न, 17 व्या वर्षी आई; 9 वर्षांतच मोडला डिंपल कपाडियाचा संसार, 'या' अभिनेत्यासोबत आजही अफेअरची चर्चा

Jalna News: मराठीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका; सावळा गोंधळ, मंठा तालुक्यातील घटना

कोण होते अयातुल्लाह अली खामेनेई? ४ दशकांपासून इराणची सत्ता हातात, अमेरिकेला मानायचे नंबर एकचा शत्रू

SCROLL FOR NEXT