सातारा

"कुशल'चे लाभार्थी अनुदानापासून वंचित; 'माण'ला 14 लाखांच्या निधीची गरज

विशाल गुंजवटे

बिजवडी (जि. सातारा) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत माण तालुक्‍यात विविध कामे सुरू असून, त्यातील 67 कामांचा "कुशल'चा 14 लाख 24 हजार 459 रुपये निधी जिल्हा रोजगार हमी योजना विभागाकडून न आल्यामुळे लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. जिल्हा रोजगार हमी योजना विभागाने याची तत्काळ दखल घेऊन माण पंचायत समितीकडे अनुदान वर्ग करावे, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जनावरांचे गोठे, फळबाग, शेळी शेड, कुकुटपालन शेड, शेततळे, नाडेप खत, गांडुळ खत, वैयक्तिक शौचालय, नवीन सिंचन विहीर योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत माण तालुक्‍यात अनेक प्रकरणे मंजूर आहेत. ही कामे करत असताना दोन ते तीन टप्प्यांत अकुशल मजुरांचा निधी दिला जातो. तर कुशलचा अंतिम टप्प्यात एकरकमी निधी दिला जातो. मात्र, तो लाभार्थ्यांना कधीच वेळेवर मिळत नसल्याने त्यांची आर्थिक अडचण होत असते. अनुदानासाठी लाभार्थी सतत हेलपाटे मारत असतात. मात्र, त्यांना निधी नाही असे सांगून परत पाठवले जाते.

त्यामुळे त्यांचा येण्या- जाण्यात पैशांचा व वेळेचा अपव्यय होत असतो. पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागाकडून लाभार्थ्यांच्या अनुदान रकमेचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हा प्रशासनाच्या रोजगार विभागाकडे पाठवण्यात येते. मात्र, त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनुदानापासून लाभार्थी वंचित राहत आहेत. जिल्हा रोजगार विभागाने याची तत्काळ दखल घेऊन "कुशल'च्या अनुदानापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांचे अनुदान त्वरित वर्ग करावे, अशी मागणी केली जात आहे.

इंडिया गेट ते गेटवे ऑफ इंडिया अंतर 29 दिवसांत पुर्ण करणा-या सुफियाची अजिंक्यता-याला गवसणी

स्कूल चले हम! पाठीवर दप्तर, खांद्यावर हात टाकत बालमित्र पाेचले शाळेत

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कसोटी क्रिकेटमध्ये मोठा बदल! अंधार पडताच होणार नवा नियम लागू; ICC ने घेतले मोठे निर्णय

६ जूनला रायगडावर इतिहास जिवंत होणार! शिवराज्याभिषेक सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, शिवरायांचा उत्सव चुकवू नका

Pune Politics: महापालिकेपासून विधान परिषदपर्यंत ‘साखरपेरणी’; विक्रम काकडेंच्या उमेदवारीमागील राजकीय गणित, पुण्यात दोन दिवसांतच फिरली समीकरणे

Yavatmal: वैद्य नगरातील जुगारावर छापा; 12 जुगारी अटकेत; अवधूतवाडी पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी मंचरमध्ये आज शेतकरी पुणे नाशिक महामार्ग रोखणार

SCROLL FOR NEXT