सातारा

घराबाहेर निघालात? थांबा! विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांचे आहे लक्ष

गजानन गिरी

मसूर (जि. सातारा) ः कोरोना पुन्हा एकदा उसळी घेण्याच्या मार्गावर असल्याने पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. 22 वाहनचालकांवर मास्क न वापरल्याने दंडात्मक कारवाई केली. 11 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. विनामास्क ग्राहकांना दुकानात घेऊन गर्दी करत नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन दुकानांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
 
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचा धडाका रविवारपासून सुरू करण्यात आला.

पोलिस दूरक्षेत्रासमोर पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांनी व पोलिस सहकाऱ्यांनी मास्कचा वापर न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, नियमांचे पालन व्हावे, यासाठी कारवाई सुरू करण्यात आली. ही माेहिम आज (साेमवार) येथील जुन्या बस स्थानक चौकात, मल्हारपेठ- पंढरपूर, कोरेगाव - कऱ्हाड मार्गावर कडक मोहीम राबवणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Drug Injections: हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; सराईत गुन्हेगार अभिषेक भडंगे अटक, ८२ बाटल्या जप्त

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात जावयाकडून सासूवर काळी जादू, स्मशानात केलं अघोरी कृत्य

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT