सातारा

बंद असलेल्या शाळा तातडीने सुरू करा; शिक्षणाधिकाऱ्यांची शाळा व्यवस्थापनाला सूचना

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यात 92 टक्के माध्यमिक शाळा सध्या सुरू झाल्या असून महाबळेश्वर तालुक्‍यातील केवळ 60 टक्केच शाळा सुरू आहेत, उर्वरित शाळाही लवकरात लवकर सुरू कराव्यात, तसेच शाळांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी सूचना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर यांनी केली. पालकांनीही विद्यार्थ्यांना शाळेत नियमितपणे पाठवून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

महाबळेश्वर तालुक्‍यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक पाचगणी येथील विद्यानिकेतन शाळेत श्री. क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, शिक्षण विस्तार अधिकारी साईनाथ वाळेकर, केंद्रप्रमुख संजय बावळेकर, दीपक चिकणे, प्रकाश भिलारे यांची उपस्थिती होती. यावेळी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, एनटीएस, एनएमएमएस परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, आधारकार्ड अद्ययावत, ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण आदी विषयांचा शाळानिहाय आढावा घेण्यात आला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train Tunnel : समुद्राखालील बुलेट ट्रेन बोगद्याला वेग; दुसऱ्या टीबीएमने खोदकामाला सुरुवात

Rohit Sharma Retirement: 'सचिन-गावसकरही गेले, रोहितलाही जावं...' हिटमॅनच्या निवृत्तीच्या चर्चांवर कपिल देव यांचं विधान चर्चेत

Ahmedabad Fire: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग; स्फोटांनी हादरला परिसर, ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, कुठे घडली घटना?

Mumbai News: केईएमच्या कारभाराची मध्यरात्री पाहणी, डॉक्टरांची अनुपस्थिती; रुग्णांच्या उपचारात विलंब

Mumbai News: बदनामी करू नका, महेश ट्युटोरियलन्सने ३३ शाखा बंद करण्याचं सांगितलं कारण; मुंबईत ३० हजार क्लासेस सुरू

SCROLL FOR NEXT