Monuments in Oglewadi blocked Demand for reinstatement in Amritmahotsavi year 
सातारा

Independence day : स्वातंत्र्यदिनाचा साक्षीदार विळख्यात

ओगलेवाडीतील स्‍मृतिस्‍तंभ अडगळीत; अमृतमहोत्‍सवी वर्षात पुन:स्‍थापनेची मागणी

मुकुंद भट

ओगलेवाडी - येथील ऐतिहासिक झेंडा चौकातील पहिल्या स्वातंत्र्यदिनाचा साक्षीदार असलेल्या झेंड्याचा चबुतरा वाचविण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. येथील मुख्य बाजार चौकात पादचारी पथाजवळ सध्या अडचणीच्या जागेत व अतिक्रमणाच्या विळख्यात असणारा स्वातंत्र्याचा साक्षीदार स्मृतिस्तंभ शासनाने मध्यवर्ती ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुन:स्थापित करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पंधरा ऑगस्टपूर्वी झेंड्याच्या चबुतऱ्याचे बांधकाम गावाच्या मध्यभागी असलेल्या झेंडा चौकात पूर्ण करून स्मृतिस्तंभ त्वरित पुनःस्थापित करून परिसरातील लोकभावनेचा आदर करावा, अशी लोकांची अपेक्षा आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तत्कालीन काँग्रेस समिती व कामगार संघटनांनी हा राष्ट्रध्वजाचा चबुतरा १५ ऑगस्ट १९४७ रोजी येथे उभारला. परिसरातील सुमारे १५ गावांतील लोकांनी एकत्रित येऊन स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा केला होता. इथून जाणाऱ्या गुहागर- विजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढताना स्वातंत्र्याचा हा स्मृतिस्तंभ बाजूला केल्याने परिसरातील ग्रामस्थांनी दुःख व्यक्त केले.

लोकांच्या मागणीनुसार बांधकाम विभागाने स्मृतिस्तंभाचा चबुतरा रस्त्याच्या एका बाजूला तात्पुरता उभारला; पण तिथे सध्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने हा चबुतरा पुन्हा अडचणीत गेला आहे.

बांधकाम खात्‍याचे दुर्लक्ष

हजारमाची ग्रामपंचायतीने पाच वर्षांपूर्वी हा स्मृतिस्तंभ मध्यवर्ती ठिकाणी पुन्हा उभारावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागास केली होती. त्यानंतर खात्याने अद्याप कोणतीही कार्यवाही लेखी आश्वासन देऊनही केली नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघरमध्ये रुग्णालयात राडा अंगलट; शिवसेनेच्या कार्यालातून ६ पदाधिकाऱ्यांसाठी फतवा, एकनाथ शिंदेंची भूमिका...

फाटक्या विचारांचे पाकिस्तानी! म्हणतात, आम्हाला Asia Cup नकोय, भारताचा पराभव हवाय; ५५ वर All OUT झाले, हे विसरले Video

Uttar Pradesh: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ! दीड लाखांहून अधिक महिलांना योगी सरकारचे गिफ्ट

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Nevasa Elderly Couple: पिण्याचे पाणीही हिरावले! नेवासेतील ज्येष्ठ दाम्पत्याचा संघर्ष; पाइपलाइन तोडली अन् काय घडलं..

SCROLL FOR NEXT